CoronamaharashtraUpdate : गेल्या २४ तासात आढळले राज्यात 12 हजार 258 नवे रुग्ण तर 370 रुग्णांचा मृत्यू

आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकड्यांनुसार, गेल्या 24 तासांत 12,258 नवे रुग्ण राज्यात सापडले असून 370 रुग्णांचे निधन झाले आहे. दरम्यान गेल्या २४ तासांच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातकोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबई, पुणे, नागपूर जिल्ह्यातली नवीन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र असून राज्यात 2,47,023 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या दैनंदिनआकडेवारीवरून मात्र काही जिल्ह्यांमध्ये मात्र कोरोनाचा धोका वाढताना असून विशेषतः ग्रामीण भागात या विषाणूने हातपाय पसरायला सुरुवात केली असल्याचं स्पष्ट होत आहे.
गेल्या 24 तासांत 17,141 रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे महाराष्ट्रातल्या अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा बऱ्याच दिवसांनी अडीच लाखांच्या खाली आला आहे. तरीही ही संख्या इतर राज्यांच्या तुलनेत प्रचंड अशीच आहे. राज्यात सध्या 22,38,351 एवढे लोक होम क्वारंटाइन अर्थात घरातच अलगीकरणात आहेत. तर 25,828 एवढे रुग्ण संस्थात्मक विलगीकरण म्हणजेच संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. दैनंदिन नव्या रुग्णसंख्येत पुणे, नागपूर आणि मुंबई जिल्ह्यांमध्ये घट झाली आहे. पुणे शहर आणि मुंबई महानगरातही दैनंदिन रुग्णवाढीचा वेग बऱ्याच प्रमाणात कमी झाला आहे. पण त्याच वेळी ठाणे जिल्ह्यातली रुग्णवाढ कायम आहे. त्यात थोडी घट असली, तरी अद्याप परिस्थिती पूर्ण आटोक्यात असल्याचं दिसत नाही. खरी वाढ दिसते आहे ती महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात.
नगर, नाशिक आणि सातारा जिल्ह्यांमध्ये रुग्णवाढीचा वेग अधिक झालेला दिसतो तर नागपूरमध्ये रुग्णवाढ कायम असली, तरी वेग कमी झाल्याचं दिसत आहे. उपलब्ध माहितीनुसार पुणे – 58868 , ठाणे -31009, मुंबई – 26003 , नाशिक – 13552, नागपूर – 10964, औरंगाबाद – 10025, सातारा – 8776 अशी अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आहे. आरोग्य विभागाने दिलेलय आकडेवारीनुसार राज्यात सध्या एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 2,47,023 असून 24 तासांतली हि 12,258 इतकी वाढआहे. याशिवाय 24 तासात मृत्यूंची संख्या 370 असून एकूण एकूण रुग्णसंख्या – 1465911 इतकी असून एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 38717 इतकी आहे. राज्याचा मृत्यूदर – 2.64% असा आहे तर रिकव्हरी रेट – 80.48% असा आहे.
केंद्रीय आरोग्य विभागाच्या नोंदीनुसार देशातल्या सरासरी मृत्यूदरापेक्षा राज्यातला मृत्यूदर अद्यापही जास्त आहे. देशात आणि अन्य राज्यांमध्येही कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण कमी राहिलं आहे. महाराष्ट्रात अद्यापही मृत्यूदर अडीच टक्क्यांहून अधिक आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी देशातील सर्वाधिक मृत्यूदर असलेल्या जिल्ह्यांबाबत माहिती दिली. सर्वाधिक मृत्यूदर असलेल्या 25 जिल्ह्यांपैकी 15 जिल्हे फक्त महाराष्ट्रातच आहेत. म्हणजे देशात सर्वाधिक मृत्यूची नोंद झालेल्या जिल्ह्यांपैकी निम्म्याहून अधिक जिल्हे महाराष्ट्रातील आहेत आणि ही खूप चिंताजनक परिस्थिती आहे.