BreakingNews : बिहारच्या निवडणुकांची घोषणा , तीन टप्प्यात होणार मतदान

निवडणूक आयोगाकडून बिहार विधानसभा निवडणुकांच्या तारखा घोषित करण्यात आल्या आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, विधानसभेच्या 243 जागांसाठी बिहारमध्ये तीन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. पहिला टप्प्यात 28 ऑक्टोबरला, दुसऱ्या टप्प्यात 3 नोव्हेंबर तर तिसऱ्या टप्प्यात सात नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर 10 नोव्हेंबर रोजी या मतदानाचा निकाल घोषित होणार आहे. बिहार विधानसभेचा कार्यकाळ 29 नोव्हेंबरला संपतो आहे. त्यामुळं नवीन सरकार हा कार्यकाळ संपण्याआधी स्थापन होणं गरजेचं आहे.
The term of assembly in the state of Bihar is due to expire on 29th November, 2020. Bihar assembly has a strength of 243 members, of whom 38 seats are reserved for SCs and two for STs: Chief Election Commissioner Sunil Arora pic.twitter.com/EabF7zoxUu
— ANI (@ANI) September 25, 2020
एकूण २४३ जागांसाठी निवडणूक होणार असून यामधील ३८ जागा अनुसूचित जाती आणि दोन जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव असणार आहेत”. निवडणुकीत १८ लाख ८७ हजार शेतकरी मतदान करु शकतील असं सुनील अरोरा यांनी यावेळी सांगितलं.
असे असणार बिहार विधानसभा निवडणुकीचे तीन टप्पे
पहिला टप्पा- 16 जिल्ह्यातील 71 जागा (28 ऑक्टोबर)
दुसरा टप्पा- 17 जिल्ह्यातील 94 जागा (3 नोव्हेंबर)
तिसरा टप्पा- 15 जिल्ह्यातील 78 जागा ( 7 नोव्हेंबर)
मतमोजणी आणि निकाल – 10 नोव्हेंबर
एका मतदान केंद्रावर 1 हजार मतदारच करु शकणार मतदान
Over 7 lakh hand sanitiser units, about 46 lakh masks, 6 lakh PPE kits, 6.7 lakh units of faces-shields, 23 lakh (pairs of) hand gloves arranged. For voters specifically, 7.2 crore single-use hand gloves arranged: Chief Election Commissioner Sunil Arora#BiharPolls #COVID19 pic.twitter.com/dcVmY9sN8G
— ANI (@ANI) September 25, 2020
निवडणूक आयोगानं म्हटलं आहे की, बिहार विधानसभा निवडणुकीसाठी ७ लाख सॅनिटायझर देण्यात येणार आहेत तर ४६ लाख मास्कची व्यवस्था केली आहे. तर ६ लाख फेस शिल्डची व्यवस्था केली आहे. सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. जे कोरोना रुग्ण आहेत ते शेवटच्या एका तासात मतदान करु शकतील. एका मतदान केंद्रावर एक हजार मतदार मतदान करु शकतील. आयोगानं म्हटलं की, कोरोना काळात बिहारमध्ये सर्वात मोठी निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व काळजी घेतली जाणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितलं की, निवडणूक अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना केवळ दोन गाड्यांची परवानगी असणार आहे.
https://twitter.com/ANI/status/1309392588147843072
बिहार विधानसभेतील बलाबल (एकूण 243 जागा)
एनडीए- 125
आरजेडी- 80
आयएनसी- 26
सीपीआय- 3
एचएएम- 1
एमआयएम- 1
आयएनडी- 5
रिक्त- 2