AurangabadCrimeUpdate : पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांची कामगिरी, दोनवर्षापूर्वीच्या खुनाचा तपास पूर्ण, दोन अटकेत

अमोल रमैश घोटाळे(२१) राकेश सुरेश चौधरी(२१)
औरंगाबाद- किरकोळ कारणावरुन खून केल्याप्रकरणी तब्बल दोन वर्षांनी खुनाचा गुन्हा वाळूज औद्योगिक पोलिसांनी उघडकीस आणला आहे.या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे.
अमोल रमैश घोटाळे(२१) आणि राकेश सुरेश चौधरी(२१) धंदा मजूरी दोघेही रा.विटावा अशी अटक आरोपींची नावे आहेत. या आरोपींनी भारत निवृत्ती अल्हाड(२७) रा. शिरसगाव ता. गंगापूर याचा दारुच्या नशेत डोक्यात दगड घालून खून केला होता. अल्हाड च्या मृत्यू प्रकरणी २०१८मधे आकस्मित मृत्यूची नोंद पोलिसांनी केली होती.पण २०१९मधे मयत अल्हाडचा मृत्यू ठार मारल्यामुळे झाला असा शवविच्छेदनाचा अहवाल आला होता. त्या नुसार पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांनी गेल्या सहा महिन्यांपासून खून झाल्यानंतर नांदेडा आणि विटावा परिसरातून किती लोक बाहेर पडले याचा बारकाईने अभ्यास केला. मयत अल्हाड आणि आरोपी अमोल घोटाळे आणि राकेश चौधरी यांना एकत्र पार्टी करतांना बघितल्याचा साक्षीदार पोलिस निरीक्षक सावंत यांना मिळाला.त्यानुसार दोन्ही संशयितांची ठावठिकाणा शोधून एपीआय गौतम वावळै यांनी पथकासह रांजणगाव पुणे परिसरातून वरील आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींनी जबाब देतांना खुनाची कबुली दिली.व सांगितले की, मयत अल्हाड याने आरोपी राकेश चौधरी कडू मोबाईल विकत घेतला होता. व त्यानंतर यू.पी. धाब्यावर दारु ची पार्टी केली नशेमधे अल्हाड राकेश आणि अमोल यांना शिवीगाळ करत होता. म्हणून वरील आरोपींनी भरत अल्हाडच्या डोक्यात दगड घालून खून केला.
या कारवाईत एपीआय गौतम वावळे,पोलिस कर्मचारी वसंत शेळके,खय्यूम पठाण, सुधीर सोनवणे, प्रदीप कुटे यांनी सहभाग घेतला होता.