Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaIndiaNewsUpdate : प्रसिद्ध गायक एस. पी. बालासुब्रमण्यम यांची प्रकृती पुन्हा गंभीर….

Advertisements
Advertisements
Spread the love

प्रसिद्ध गायक एसपी बालासुब्रमण्यम यांनी कोरोनावर मात केल्याचे वृत्त येत नाही तोच त्यांची प्रकृती पुन्हा खालावली असल्याचे वृत्त आहे. बालासुब्रमण्यम यांची प्रकृती आता गंभीर झाली आहे, ते लाइफ सपोर्टवर आहेत अशी माहिती रुग्णालयाने दिली आहे. बालासुब्रमण्यम यांना गेल्या महिन्यात कोरोनाचं निदान झालं होतं. ५ ऑगस्टला त्यांना एमजीएम हेल्थकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.  त्यावेळी त्यांनी आपला व्हिडीओ जारी केला होता आणि आपण बरं असल्याची माहिती आपल्या चाहत्यांना दिली होती.

Advertisements

काही दिवसांपूर्वीच त्यांची चाचणी नेगेटिव्ह आली. त्यांचा मुलगा एसपी चरण यांनीदेखील  19 सप्टेंबरला आपल्या सोशल मीडियावर व्हिडीओ जारी करत आपल्या वडीलांच्या आरोग्याबाबत माहिती दिली होती. माझे वडील आता व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांचे रिपोर्ट्स आणि इतर  पॅरामीटर्सही नॉर्मल आहेत. आता ते पूर्णपणे ठिक आहे. लवकरात लवकरत त्यांना डिस्चार्ज मिळेल अशी आशा आम्हाला आहे. त्यांना कोणतंही संक्रमण नाही. मात्र फुफ्फुस, श्वासोच्छवास आणि शारीरिक शक्ती यामध्ये अजून सुधारणा होण्याची गरज आहे”, असं त्यांनी व्हिडीओतून सांगितलं होतं. आज 24 सप्टेंबरला हॉस्पिटलने त्यांचं मेडिकल बुलेटिन जारी केलं आहे. हॉस्पिटलने दिलेल्या माहितीनसार, “गेल्या 24 तासांत त्यांची प्रकृती ढासळते आहे. त्यांची प्रकृती खूपच गंभीर आहे, त्यांना लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आलं आहे. तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत”

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!