AurangabadCrimeUpdate : नावातील साधर्म्याचा फायदा घेऊन शिक्षकाने लांबवली वाहन चालकाची सव्वा लाखाची माया….

औरंगाबाद – नावातील साधर्म्याचा फायदा घेऊन एका शिक्षकाने वाहनचालकाचे सव्वालाख रु. एटीएम चा गैरवापर करीत लांबविल्यावरून संबंधित शिक्षकाविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिस निरीक्षक मनोज पगारे यांनी दिलेली अधिक माहिती अशी कि , दिलीप साठे असे भामट्याचे नाव आहे. वाळूज औद्योगिक परिसरातील एसबीआय बॅंकेत शांतीपुर्यातील दिलीप फिलीप साठे धंदा. खाजगी वाहन चालक यांचे १ लाख १९ हजारांचे फिक्स डिपाॅझिट आहे. त्यांनी एटीएम खराब झाल्यामुळे दुसरे मिळण्यासाठी अर्ज केला होता. आरोपीही शांतीपुर्यात राहात असल्यामुळे चुकुन नवे एटीएम कार्ड शिक्षक असलेल्या साठेच्या हातात पडले. आरोपीने एटीएम ची माहिती घेत आपला नंबर अपडेट करून रक्कम काढून घेतल्याची माहिती तपासात उघंड झाली. फिर्यादी दिलीप फिलीप साठे यांनी मुलीच्या लग्नासाठी हि रक्कम जमा केली होती.