CoronaEffect : कोरोनामुक्त होण्यासाठी नेमका किती दिवसांचा कालावधी लागतो जाणून घ्या….

कोणत्याही रुग्णाला कोरोनामुक्त होण्यासाठी नेमका किती दिवसांचा कालावधी लागतो हे जाणून घेण्यासाठी मोडेना आणि रेजिओ एमिलिया युनिव्हर्सिटीचे डॉ. फ्रान्सिस्को व्हेंतुरेली आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ११६२ रुग्णांचा अभ्यास केला असता यात कोरोना रूग्णांची दुसरी चाचणी १५ दिवसांनी, तिसरी १४ दिवसांनी आणि चौथ्यांदा ९ दिवसांनी करण्यात आली. यात असे आढळले की ज्यांचे पूर्वीचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, आता ते पॉझिटिव्ह आहेत. पाच लोकांच्या निगेटिव्ह चाचणीत सरासरी एक निकाल चुकीचा असतो. अभ्यासानुसार ५० वर्षापर्यंतच्या लोकांना ३५ दिवस आणि ८० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना बरे होण्यासाठी ३८ दिवस लागतात.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सतत ७५ हजारहून अधिक नवे रुग्ण आढळून येत होते. १ सप्टेंबर रोजी ६ दिवसांनी कोरोना रुग्णांच्या संख्येत घट पाहायला मिळाली, मात्र आज पुन्हा कोरोनाचा विस्फोट झाला आहे. गेल्या २४ तासांत ७८ हजार ३५७ नवीन रुग्ण सापडले आहे. तर, १०४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार सध्या देशात ३७ लाख ६९ हजार ५२४ एकूण रुग्ण आहेत. तर, ८ लाख ०१ हजार २८२अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत २९ लाख १९ हजार ९ रुग्ण निरोगी झाले आहेत. तर, ६६ हजार ३३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या काही कमी होताना दिसत नाही आहे. सध्या जगात एकूण २ कोटी ५८ लाख ८९ हजार ८२४ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. यातील १ कोटी ८१ लाख ७२ हजार ६७१ रुग्ण निरोगी झाले आहेत. तर, ८ लाख ६० हजार २७० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, जगभरात तब्बल ६८ लाख ५६ हजार ८८३ अॅक्टिव्ह रुगण आहेत. त्यामुळे आता साऱ्या जगाचं लक्ष कोरोना लशीकडे लागले आहे.