MaharashtraCrimeUpdate : अबू सालेमच्या नावाने ३५ कोटीच्या खंडणीसाठी महेश मांजरेकर यांना धमक्या , एकास अटक

अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमच्या नावाने प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना ३५ कोटींच्या खंडणीसाठी धमकी देण्यात आली असल्याचे वृत्त आहे. उपलब्ध माहितीनुसार महेश मांजरेकर यांना त्यांच्या व्हॉट्सअॅपवरून गेल्या दोन दिवसांपासून धमकीचे मेसेज येत होते. त्यात त्यांना ३५ कोटी रुपये खंडणी देण्याची मागणी केली जात होती. अखेर मांजरेकर यांनी काल खंडणीविरोधी पथकाकडे जाऊन रीतसर तक्रार नोंदवली. यावेळी खंडणीविरोधी पथकाला सर्व मेसेज दाखवून धमकी येत असलेल्या मोबाइलचा नंबरही देण्यात आला. त्यानंतर खंडणीविरोधी पथकाने तात्काळ कार्यवाही करत रत्नागिरीतून एकाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणाचा अबू सालेमशी काही संबंध आहे का?, धमकी देण्यामागचं नेमकं कारण काय? याचा तपास खंडणीविरोधी पथकाकडून करण्यात येत आहे.