AurangabadNewsUpdate : ‘वेल्डर’ची सुसाईड नोट लिहून रेल्वेखाली उडी,आरोपीत महिला पोलीस कर्मचार्याचा समावेश

औरंगाबाद – मुकुंदवाडीतील स्वराजनगरात राहणार्या ‘वेल्डर’ने सुसाईड नोट लिहून आज सकाळी रेल्वेखाली आत्महत्या केली.या प्रकरणी पोलिस मुख्यालयात काम करणार्या महिला पोलिसासहित चौघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. शिवाजी खांडेभराड (५१) असे मयताचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि , यांचे शेजारी राहणार्या सुरेखा धोंडगे यांच्याशी घरासमोर माती टाकण्यावरुन १९ आॅगस्ट रोजी भांडण झाले होते. त्यावेळी धोंडगे नावाच्या महिलेने तिच्या दोन मुली त्यापैकी एक छाया महिला पोलिस आणि कंडक्टर असलेली मुलगी आणि मुलगा परमेश्वर खांडेभराड यांना मदतीला बोलावले. किरकोळ कारणावरुन जास्त पेटलेल्या भांडणामुळे शनिवारी सकाळी ८च्या सुमारास शिवाजी खांडेभराड यांनी रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली, या प्रकरणी महिला पोलिस छाया, तिची कंडक्टर बहीण, भाउ परमेश्वर आणि त्यांची आई सुरेखा धोंडगे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक शरद इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय दादासाहेब कोपनर करंत आहेत