IndiaNewsUpdate : काँग्रेसच्या राष्ट्रीय पदाचा तिढा सुटेना , प्रियांका गांधी यांनी व्यक्त केले हे मत

पक्ष म्हणून काँग्रेस नेत्यांच्या पातळीवर काही हालचाली सुरु असल्या तरी लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधी यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर गांधी कुटुंबियांकडून कोणीही पक्षाच्या अध्यक्षपदाची जबादारी घेण्यास तयार नाही . त्यामुळे सध्या काँग्रेस अध्यक्षाचा विषय सातत्याने चर्चेत आहे. सोनिया गांधींनंतर काँग्रेस अध्यक्षपद दरम्यान सोनिया गांधींनी काही काळासाठी जबाबदारी घेतली असली तरी आता काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी द्यायची कुणावर याचा शोध सुरू झाला आहे.
सोनिया , राहुल यांच्यानंतर काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी वाड्रा यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घ्यावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा असली तरी त्यांनीही हि जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यांच्या मतानुसार राहुल गांधी यांनी सुचवल्याप्रमाणे गांधी घराण्याशिवाय दुसऱ्या व्यक्तीने काँग्रेस अध्यक्ष व्हायला हवं.
यावर आपले मत व्यक्त करताना त्या म्हणाल्या की, माझे लक्ष उत्तर प्रदेशात पक्ष मजबूत करण्यावर मी केंद्रित करणार आहे. त्या पुढे म्हणाल्या, माझ्यासाठी माझा भाऊ लीडर आहे व तोच नेहमी राहील. त्या पुढे म्हणाल्या, भाजपविरोधात लढण्यासाठी उत्तर प्रदेश आणि देशातील दुसऱ्या भागातील शेकडो लोक सक्षम आहेत. ते युवा नेतादेखील आहेत. भविष्यात काय होईल हे मी सांगू शकत नाही. मात्र पक्षाचं नेतृत्व करण्यासाठी अनेक लोक सक्षम आहेत. त्या पुढे म्हणाल्या की गेल्या 3 ते 4 वर्षांमध्ये कोणीच माझ्या भावाप्रमाणे मोदींविरोधात लढा दिला नसेल.