Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह , उपचारार्थ पुन्हा एम्समध्ये दाखल

Advertisements
Advertisements
Spread the love

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असली तरी गेल्या दोन-तीन दिवसांपासून अस्वस्थ वाटत होते. त्यांमुळे त्यांना रात्री दोन  वाजता AIIMSच्या ओल्ड प्रायव्हेट वार्डमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांना ठेवण्यात आले आहे. या आधी अमित शाह यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. उपचारानंतर दुसऱ्यांदा चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अमित शाह होम आयसोलेशनमध्ये होते. केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या संदर्भात एम्स रुग्णालयानं एक निवेदन जारी केलं आहे.

Advertisements

दरम्यान अमित शहा यांनी गेल्या आठवड्यात 14 ऑगस्ट रोजी कोरोनामुक्त झाल्याचे स्वतः ट्वीट करून आपल्या प्रकृतीविषयी माहिती दिली होती. त्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले होते कि , “माझी कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. मी देवाचे आभार मानतो आणि ज्या लोकांना माझ्या आरोग्यासाठी प्रार्थना केली, माझ्या कुटुंबियांना आधार दिला त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो”. मात्र आता पुन्हा त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!