AurangabadCrimeUpdate : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार , पीडिता पाच महिन्याची गर्भवती…

औरंगाबाद- बदनापूर तालुक्यातील तरुणाने बीड बायपास परिसरात राहणार्या ओळखीच्या तरुणीचे लग्नाचे अमीष दाखवत लैगिक शोषण केल्यामुळे पाच महिन्यांची गर्भवती झाल्यानंतर आरोपीने लग्नास नकार दिला.या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात बलात्कार आणि अॅट्राॅसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्ञानेश्वर पचलोरे (२०) रा. भाकरवाडी ता. बदनापुर असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.पिडीता ही औरंगाबादला नौकरी करते असे समजल्यावर आरोपीने मार्च २०२० मधे पिडीतेचा शोध घेत तिचे लैंगिक शोषण केले. या प्रकरणी पिडीता ही तिच्या आई आणि आत्याला घेऊन पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री आली व आरोपी विरुध्द तक्रार देताच गुन्हा बाखल झाला. या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस आयुक्त रिविंद्र साळोखे करंत आहेत. अशी माहिती एपीआय घन्नशाम सोनवणे यांनी दिली