AurangabadCrimeUpdate : प्रेम प्रकरणातून दोन गटात सशस्त्र हल्ला , ६ जण गंभीर जखमी , दोघांना अटक

औरंगाबाद जिल्ह्याच्या पैठण शहरातील जोहरीवाडा भागात प्रेमप्रकरणावरून एका गटाने दुसऱ्या गटावर केलेल्या सशस्र हल्ल्यात दोन महिलांसह सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून, इतर आरोपी पसार झाले आहेत. या विषयीची प्राथमिक माहिती अशी कि , जोहरीवाडा परिसरात मंगळवारी एका प्रेमप्रकरणावरून दोन गट एकमेकांसमोर समोर आले. यावेळी उपस्थित नागरिकांनी दोन्ही गटांना समजात वाद मिटवला. मात्र, एका तासानंतर एका गटाने कोयते, तलवारी, व लोखंडी रॉडच्या सहाय्याने दुसऱ्या गटातील महिला व पुरुषांवर सशस्त्र हल्ला केला. या हल्ल्यात दोन महिलांसह सहा जण गंभीर जखमी झाले असून, या सर्व जखमींना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. या सशस्त्र हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून आधी तपस चालू सल्याचे सांगण्यात येत आहे. . दरम्यान, भरवस्तीत घडलेल्या या सशस्त्र हल्ल्यामुळे जोहरीवाडा, नेहरू चौक, पावर हाऊस परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या प्रकरणातील आरोपीच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.