AurangabadCrimeUpdate : बीड बायपास रोडवरील हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेचा छापा, तीन ग्राहकासह पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

औरंंंगाबाद : बीड बायपास रोडवरील एका हॉटेलच्या गच्चीवर गेल्या काही दिवसापासून बिनबोभाटपणे सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर गुन्हेशाखा पोलिसांनी छापा मारला. या कारवाईत पोलिसांनी तीन ग्राहकांसह हॉटेलमधील दोन कर्मचा-यांना ताब्यात घेतले. हॉटेलमध्ये काम करणारे दोन्ही कर्मचारी परराज्यातील असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांनी शुक्रवारी (दि.२४) दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुबोजीत करूणा मजुमदार (वय २३, रा.प्लॉट नं २१, कल्याणी,जि.नदिया, पश्चिम बंगाल, ह.मु. नाईकनगर, बीडबायपास), शफिकुल इस्लाम नासीरउद्दीन (वय २२, रा.हवरागड गाव, बडवाली,जि.हुजाई, आसाम, ह.मु. नाईकनगर, बीडबायपास) असे पोलिसांनी अटक केलेल्या हॉटेलमधील कर्मचा-यांची नावे आहेत. बीडबायपास रोडवर सागर कैलास काळे हा हॉटेल कार्निवलमध्ये अनाधिकृतरित्या हुक्का पार्लर चालवत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अजबसिंग जारवाल, उपनिरीक्षक विजय पवार, सहाय्यक फौजदार विठ्ठल जवखेडे, जमादार गावंडे, गोविंद पचरंडे, राजपुत, पिंपळे, बेलकर, सुरे, संदीप सानप, पवार आदींच्या पथकाने कार्निवल हॉटेल येथे गुरूवारी रात्री छापा मारला. त्यावेळी हॉटेलमध्ये तीन ग्राहक तंबाखूजन्य हुक्का सेवन करतांना मिळून आले. पोलिसांनी हॉटेलचे कर्मचारी सुबोजित मजुमदार, शफिकुल इस्लाम यांच्यासह तीन ग्राहकाविरूध्द पुंडलिकनगर पोलिस ठाण्यता गुन्हा दाखल केला आहे.