AurangabadCoronaUpdate : धक्कादायक : दुपारपर्यंत ५ मृत्यू, जिल्ह्यात 4735 रुग्णांवर उपचार सुरू, 20 रुग्णांची वाढ

UPDATE : 4:35 PM
जिल्ह्यातील 20 रुग्णांचे अहवाल दुपारी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत 11440 कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी 6300 बरे झाले, 405 जणांचा मृत्यू झाला. तर 4735 जणांवर उपचार सुरु आहेत. रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :
मनपा हद्दीतील (15)
न्यू हनुमंत नगर (1), शिवाजी नगर, गारखेडा (1), बालाजी नगर (1), म्हाडा कॉलनी, बजाज नगर (1), सह्याद्री नगर (1),सॅबेस्तियन कॉलनी (1), खडकेश्वर (1), म्हाडा कॉलनी, एन दोन सिडको (1), अजब नगर (1), एन सहा सिडको (1) एन दोन सिडको (1), अन्य (4),
ग्रामीण (05)
नेवरगाव, गंगापूर (1), राजापूर (1), देवगाव रंगारी (1), गंगापूर (1), वडगाव कोल्हाटी (1)
पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत न्याय नगरातील 51 वर्षीय स्त्री, पडेगावातील 83 वर्षीय पुरूष, हर्सुलच्या चेतना नगरातील 70 वर्षीय स्त्री, कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी येथील 65 वर्षीय स्त्री, खासगी रुग्णालयात श्रेय नगरातील 48 वर्षीय पुरूष या कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला