लोकसभा २०१९ : प्रकाश आंबेडकरांनी विषय संपवला, स्वतंत्र लढणार

वंचित बहुजन आघाडी आणि भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाआघाडीतील समावेशाचा प्रश्न त्यांच्या दृष्टीने संपवला आहे.
काँग्रेससोबत चर्चेचे सर्व पर्याय संपले आहेत, काही ठोस निर्णय झालेला नाही, असे सांगत आंबेडकर यांनी लोकसभा निवडणूका स्वतंत्रपणे लढवण्याची घोषणा केली आहे. येत्या १५ तारखेला महाराष्ट्रातील ४८ जागांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले आहे.
प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी महाआघाडीत सहभागी होईल, अशी काही दिवसांपासून चर्चा होती. पण काँग्रेससोबतच्या चर्चेचे सर्व पर्याय संपले आहेत असं सांगून त्यांनी महाआघाडीत जाण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला. आमचे २२ उमेदवार मागे घेऊ शकत नाही. महाराष्ट्रातील ४८ जागांसाठी उमेदवार जाहीर करणार आहोत, अशी घोषणाही त्यांनी अकोल्यातील पत्रकार परिषदेत केली.
its nice n large news
Thanks Madam . keep in touch .