AurangabadNewsUpdate : CyberCrime : इ-काॅमर्स प्रतिष्ठानचे नाव घेत डाॅक्टरचे ९२ हजार खात्यातून लंपास

औरंगाबाद – मायिंत्रा या इ काॅर्मस प्रतिष्ठान कडून घेतलेली वस्तू परंत करण्यासाठी गुगलवर मायिंत्रा चा नंबर शोधून संपर्क केला असता.डाक्टरचा फोन रिसीव्ह केलेल्या भामट्याने गुगल पे चे डाॅक्टरचे डिटेल मागवून त्यांच्या खात्यातून ९२ हजार १६रु.लंपास केल्याचे उघंड झाले.ही घटना गेल्या ५जुलै ची आहे.या प्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात आज गुन्हा दाखल झाला आहे.
डाॅ.अनिल नामदेव घुगे असे फसवणूक झालेल्या डाॅक्टरचे नाव आहे. गुन्हा घडल्यानंतर ६जुलै रोजी घुगे यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली तर आज हर्सूल पोलिसांकडेही तक्रार दिली आहे. वरील प्रकरणी पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्ग दर्शना खाली पुढील तपास सुरु आहे.
जिन्सी पोलिसांच्या गुन्ह्यातून सुटताच पुन्हा मोटरसायकल चोरी,सिडको औद्योगिक पोलिसांकडून अटक
औरंगाबाद – जिन्सी पोलिसांनी घरफोडी प्रकरणात अटक केलेला सय्यद हनीफ सय्यद हबीब(२२) रा.शरीफ काॅलनी याला सिडको औद्योगिक पोलिसांनी आज मोटरसायकल चोरी प्रकरणात मुद्देमालासह अटक केली.
कटकटगेट भागातील मुकर्रमखान मेहबुबखान पठाण(४२) हे मासे खरेदीसाठी मुकुंदवाडीमधील एस.टी.वर्कशाॅप परिसरात आले असतांना त्यांची अॅक्टीवा स्कूटर सय्यद हनीफ ने लंपास केली. या प्रकरणी एम.सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. पोलिस कर्मचारी मुनीर पठाण, दिपक शिंदे, विक्रांत पवार यांनी पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली गस्तीवर असतांना सय्यद हनिफ ला मुद्देमालासह अटक केली.पीढील तपास पोलिस कर्मचारी मुनीर पठाण करंत आहेत.
उघड्या खिडकीतून मोबाईल चोरणारे गुन्हे शाखेकडून मुद्देमालासह अटक
औरंगाबाद -रांजणगाव शेणपुंजी गावातून १३जून रोजी खिडकी ठेवून झोपणार्या नागरिकाचा मोबाईल लंपास करणारे दोन चोरटे गुन्हे शाखेने मुद्देमालासह अटक केले आहेत. वरील प्रकरणी वाळूज औद्योगिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
शुभम अशोक झा (२३) रा.रांजणगाव शेणपुंजी आणि सन्नी राजू कुलथे(१९) अशी अटक आरोपींची नावे आहेत. आरोपींच्या ताब्यातून ४मोबाईल जप्त करण्यात आले. वरील कारवाई पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय योगेश धोंडे, पोलिस कर्मचारी सय्यद मुजीब अली , गजानन मांटे, नितीन देशमुख, राहील करात यांनी पार पाडली.