AurangabadCrimeUpdate : महिला डॉक्टरला सव्वा लाखाला सायबर भामट्यांनी लावला चुना

औरंगाबाद – घाटी रुग्णालयातील महिला डाॅक्टरच्या मोबाईलवर लिंक पाठवून तिच्या बॅंक खात्यातून गेल्या २६ जून रोजी १ लाख २५ हजार रु.काढून घेतले.
या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
डाॅ. हर्षिता सुधाकर (२५) रा. कोम्पुयनगर जि.कोलार कर्नाटक असे फसवले गेलेल्या महिला डाॅक्टर चे नाव आहे. त्या कामात व्यस्त असल्यामुळे तक्रार देण्यास उशीर झाला असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक सचिन सानप पुढील तपास करंत आहेत.
करमणूकीसाठी हेल्यांचा छळ, दोघांना बेड्या
औरंगाबाद – नागरिकांच्या करमणूकीसाठी हेल्यांच्या टक्कर खेळवणार्या दोघांना मुक प्राणीछळविरोधी कायद्यांतर्गत सातारा पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
फैजान शेख सलाऊद्दीन शेख (१९) रा.बायजीपुरा व जिलानी रऊफ शेख रा.देवळाई खाजानगर अशी अटक आरोपींची नावे आहेत वरील दोघांनी आज सकाळी ११वा.जबिंदा ग्राउंडवर हेल्यांच्या टक्कर घडवून नागरिकांची करमणूक करण्याचा प्रयत्न केला.सहाय्यक फौजदार मच्छींद्र ससाणे यांच्या तक्रारी वरुन वरील दोघांवर कारवाई झाली पुढील तपास ए.एस.आय. चव्हाण करंत आहेत