Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

जुलैमध्ये होणाऱ्या JEE आणि NEET प्रवेश परीक्षा आता सप्टेंबरमध्ये

Spread the love

JEE आणि NEET या जुलैमध्ये होणाऱ्या प्रवेश परीक्षांच्या तारखा दोन महिन्यांनी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक (Ramesh Pokhriyal Nishank) यांनी नव्या तारखांची घोषणा केली आहे. JEE Main 2020 ची परीक्षा आता 1 ते 6 सप्टेंबर दरम्यान होईल, तर NEET 2020 ही परीक्षा आता 13 सप्टेंबरला होईल. JEE ची पुढची परीक्षा JEE Advanced आता 27 सप्टेंबरला होणार आहे. नेशनल टेस्टिंग एजंन्सीच्या (NTA) सूत्रांनुसार, या परीक्षांचे निकाल सप्टेंबरमध्ये घोषित होतील. त्याच्यापुढे प्रवेशप्रक्रिया सुरू होईल.  निकाल लागण्यासाठी सप्टेंबरचा मध्य उजाडू शकतो. त्यामुळे ऑक्टोबरनंतरच नवीन शैक्षणिक वर्षाची सेमिस्टर सुरू होऊ शकते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!