Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CurrentNewsUpdate : NEET आणि JEE परीक्षांपाठोपाठ आता सीए परीक्षाही  रद्द

Advertisements
Advertisements
Spread the love

NEET आणि JEE परीक्षांपाठोपाठ आता मे 2020 च्या सीए परीक्षाही  रद्द करण्यात आल्या असून आता नोव्हेंबर 2020 मध्ये पुढील परीक्षा होणार आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाने शुक्रवारी (3 जुलै) रात्री उशिरा यासंदर्भात ट्विटरवर पत्रक जारी करुन माहिती दिली. सदर परीक्षा 2 मे ते 18 मे दरम्यान होणार होती. मात्र देशभरातील कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पाहता परीक्षा पुढे ढकलून 19 जून ते 4 जुलै दरम्यान घेण्याचं ठरलं होतं. मात्र त्यानंतरही ही परीक्षा रद्द करुन जुलै ते ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्याचा निर्णय झाला. तत्पूर्वी  ही परीक्षा 29 जुलै ते 16 ऑगस्ट दरम्यान पार पडणार होती. मात्र आता ही परीक्षा नोव्हेंबर महिन्यात होणार आहे.

Advertisements

दरम्यान आयसीएआने शुक्रवारी उशिरा यासंदर्भात अधिसूचाना जारी केली. आयसीएआयनुसार, “ज्या विद्यार्थ्यांनी मे 2020 परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यांच्याकडे आता नोव्हेंबर 2020 परीक्षेसाठी नवा अर्ज करताना आपला ग्रुप आणि परीक्षा केंद्र बदलण्याचापर्याय असेल. नोव्हेंबरमध्ये होणारी सीए परीक्षा 1 तारखेपासूनच सुरु होईल. मात्र परीक्षा सुरु होण्याआधी परिस्थितीचा आढावा घेतला जाईल.” 29 जुलै ते 16 ऑगस्टदरम्यान होणाऱ्या सीए परीक्षेच्या आयोजनाची व्यवहार्यता पडताळली जाईल, असं आयसीएआने गुरुवारी (2 जुलै) सर्वोच्च न्यायालयात सांगितलं होतं. देशभरात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन परीक्षा स्थगित करावी अशी मागणी विद्यार्थी वारंवार करत होते.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!