AurangabadCrimeUpdate : मोटरसायकल चोराकडून सहा मोटरसायकल जप्त, गुन्हे शाखेची कारवाई

औरंगाबाद – हर्सूल परिसरातील हरसिध्दी देवीच्या मंदीर परिसरात चोरीची मोटरसायकल विक्रीसाठी आणलेल्या सराईत चोरट्याला गुन्हेशाखेने अलगद ताब्यात घेत शहरातील पाच व जळगाव जिल्ह्षातील एक अशा सहा मोटरसायकल चोरट्याकडून जप्त केल्या.
इम्रान अजीज मन्सूरी (२३) रा.श्रीरामपूर हल्ली मु.जहाॅंगिर काॅलनी असे अटक चोरट्याचे नाव आहे. शहरातील सिटीचौक, क्रांतीचौक,सिडको, जवाहरनगर या पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरट्याने १लाख ७० हजारांच्या होंडा कंपनीच्या मोटरसायकल लंपास केल्या हौत्या.वरील कारवाई सहाय्यक पोलिस आयुक्त डाॅ नागनाथ कोडे व पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय नरसिंग पोमनाळकर यांनी पार पाडली.त्यांच्या सोबंत पोलिस कर्मचारी गोमटे, नितीन देशमुख, बाबर यांनी सहभाग घेतला होता.