AurangabadCrime : शहरभर चोरट्यांचा धुमाकूळ , लाखोंचा ऐवज लंपास

औरंंंगाबाद : लॉकडाऊनच्या काळात शहरभर चोरट्यांनी धुमाकुळ घातला आहे. चोरट्यांनी गारखेडा परिसरातील वकीलाचे घरासह दोन घरफोड्या करीत एका दुकानाचे शटर उचकटून लाखो रूपये किमतीचा ऐवज लंपास केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गारखेडा परिसरातील हनुमाननगरात राहणारे अप्पासाहेब कचरू दानवे (वय ३०) हे व्यवसायाने वकील आहेत. अप्पासाहेब दानवे हे कुटुंबियासहीत बाहेरगावी गेल्याची संधी साधुन चोरट्यांनी २५ जूनच्या पहाटे घराचे कुलूप तोडले. चोरट्यांनी दानवे यांच्या घरातून २१ हजार रूपये किमतीचे सोने-चांदीचे दागीने चोरून नेले. दुस-या घटनेत, वाळुज परिसरातील कदीम-शहापूर येथील रहिवासी विलास रामचंद्र चापे (वय ४७) यांच्या घराचा पाठीमागील दरवाजा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. चोरट्यांनी विलास चापे यांच्या घरातून ७० हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र चोरून नेले.
दरम्यान, चोरट्यांनी इंदिरानगर-बायजीपुरा भागातील रहिवासी शकील मोहम्मद हुसैन कुरैशी (वय ३८) यांचे किराणा दुकानाचे शटर उचकटून १५ हजार २०० रूपये चोरून नेले. शहरभर धुमाकुळ घालणा-या चोरट्याविरूध्द अनुक्रमे पुंडलिकनगर, वाळुज आणि जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारचालकाचा पाठलाग करून बेदम मारहाण
औरंंंगाबाद : जालना रोडपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या काल्डा कॉर्नर येथून गारखेडा परिसरातील श्रीकृष्णनगरात राहणा-या कारचालकाचा दोन जणांनी दुचाकीवर पाठलाग करून लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. ही घटना २६ जून रोजी रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान श्रीकृष्णनगर भागात घडली.
प्रशांत शालीकराव पाटील (वय ४१, रा.श्रीकृष्णनगर) हे आपल्या कारने काल्डा कॉर्नर येथून आपल्या घराकडे जात होते. काल्डा कार्नरजवळ दुचाकीवर आलेल्या दोन जणांनी प्रशांत पाटील यांच्या कारच्या काचवर काठीने मारले. त्यानंतर पाटील यांचा श्रीकृष्णनगरपर्यंत पाठलाग केला. प्रशांत पाटील हे कारमधुन खाली उतरल्यानंतर पाठलाग करणा-या दोघांनी त्यांना काठीने बेदम मारहाण करून दुचाकीवर धुम ठोकली. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार चव्हाण करीत आहेत.