AurangadCrimeUpdate : खुनाचा आरोपी उपचारा दरम्यान पसार

औरंगाबाद – जवाहरनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल असलैला आरोपीछातीत दुखंत असल्याबाबत घाटी रुग्णालयातून आज पहाटे हाथकडीसह पसार झाला या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
इम्रान अमीर बेग(३२) रा. काबरानगर गारखेडा परिसर असे फरार आरोपीचे नाव आहे. काल गुरुवारी रात्री १०वा. इम्रान बेग ने छातीत दुखंत असल्याचे हर्सूल कारागृहातील डाॅक्टरांना सांगितले.त्यामुळे प्राथमिक तपासणी करुन इम्रान बेग ला दोन हर्सूल कारागृहाचे कर्मचारी प्रभाकर कांबळे आणि राहूल राठोड यांनी आरोपी बेगला घाटी रुग्णालयात आणले पहाटे ३वाजे पर्यंत प्रभाकर कांबळे यांनी ड्यूटी केल्या नंतर राहूल राठोड यांची ड्यूटी सुरु झाली.दरम्यान आरोपी बेग हा वाॅर्ड क्र. १३मधे हाथकडी सहीत पलंगाला बांधलेला असतांना पुन्हा छातीत दुखंत असल्याचे राठोड यांना सांगून डाॅक्टरांना बोलवण्याकरता पाठवले.व पलंगाला लाॅक केलेली हाथकडी तोडून इम्रान बेग पसार झाला.थोड्यावेळाने पोलिस कर्मचारी राठोड डाॅक्टरला घेऊन वाॅर्ड मधे परतले असता इम्रान जागेवर दिसला नाही ही घटना घडल्यानंतर हर्सूल कारागृहाचे अधिक्षक हिरालाल जाधव यांनी घाटी रुग्णालयात भेट दिली.पोलिस कर्मचारी प्रभाकर कांबळे आणि राहूल राठोड यांनी त्यांचे जबाब अधिक्षकांकडे नोंदवले आहेत या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली बेगमपुरा पोलिस करंत आहेत