AurangabadUpdate : शासकीय कामात अडथळा , चौघांवर गुन्हा दाखल

औरंगाबाद – कोविड सर्वे करंत असलेल्या प्राध्यापिकेच्या कामात व्यत्यय आणल्या प्रकरणी चार इसमांविरुध्द सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा जिन्सी पोलिस ठाण्यात आज दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साजिद परियानी, सय्यद इस्माईल, मोहम्मद जुबेर व अन्य एक अशी गुन्हा दाखल झालेल्या इसमांची नावे आहेत. वरील चौघांनी १३ जून रोजी सकाळी ११.३० सुमारास कैसर काॅलनी गल्ली नंबर ४ मधे महापालिकेच्या वतीने कोविड सर्वे करणार्या महिलेशी असभ्य भाषेत संवाद साधला व त्याचा व्हिडीओ तयार करुन यूट्यूबवर अपलोड केला. असा आरोप पिडीत महिलेने तक्रारीत केला आहे.आज(१८/०६) रोजी पिडीतेने पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन क्रार दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढील तपास एपीआय शरद जोगदंड करंत आहेत
तरुणीसहित एकाचा गळफास
औरंगाबाद – जवाहर काॅलनी परिसरात राहणार्या मजूराने आज दुपारी पंख्याला दोरी अडकवून गळफास घेतला.तर सिडको परिसरात एन ७मधे एका शिक्षीकेने पंख्याला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केल्याची नोंद जवाहरनगर आणि सिडको पोलिस ठाण्यात झाली आहे.
राहूल बोर्डे (३२) रा.बौध्दनगर, जवाहर काॅलनी व प्रतिषा भरत काळे (२५) रा सिडको अशी मयतांची नावे आहेत. राहूल बोर्डे हा गुजराथ मधे मजूरी करंत होता.लाॅकडाऊनमुळे त्याला घरी परताव लागले होते.तर प्रतिषा ही शिक्षीका असल्याचे पोलिस तपासात उघंड झाले आहेत. वरील प्रकरणांचा तपास पोलिस निरीक्षक संतोष पाटील व अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करंत आहेत