IndiaChinaNewsUpdate : भारत -चीन सैनिक भिडले , २० भारतीय सैनिकांचा मृत्यू

Army vehicles stop at a base camp in Leh in the cold desert region of Ladakh, 434 kms from Srinagar. The peaks in Kargil area of Ladakh witnessed a war between Indian soldiers and the soldiers of the neighbouring Pakistan in the summer of 1999. Express Photo By Shuaib Masoodi, 05.07.2014.
At least 20 Indian soldiers killed in the violent face-off with China in Galwan valley in Eastern Ladakh. Casualty numbers could rise: Government Sources pic.twitter.com/PxePv8zGz4
— ANI (@ANI) June 16, 2020
गेल्या काही दिवसांपासून भारत- चीन सीमेवर तणावाचे वातावरण असून काल रात्रीपासून झालेल्या हिंसक कारवायांमध्ये भारताच्या बाजूच्या किमान २० सैनिकांचा मृत्यू झाल्याचं सरकारी सूत्रांनी सांगितलं आहे. दरम्यान एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. या चकमकीत चीनचे किमान ४३ सैनिक जखमी किंवा मृत्युमुखी पडले असण्याची शक्यता आहे, असंही वृत्तसंस्थेने म्हटलं आहे.
गेल्या महिनाभरापासून पूर्व लडाख जवळच्या सीमा रेषेवर संघर्ष सुरू आहे. पण त्यावर चर्चेअंती सैन्य मागे घेण्याचा निर्णय झाल्यानंतरही काल रात्री दोन्ही बाजूंच्या सैनिकांमध्ये तुंबळ चकमक झाली. लडाखमध्ये गलवान खोऱ्यात दोन्ही प्रत्यक्ष ताबारेषेजवळ दोन्ही बाजूंचे सैनिक एकमेकांना भिडले. यात सुरुवातीला भारताचा एक कर्नल आणि दोन जवान शहीद झाल्याचं वृत्त होतं. त्याबद्दल औपचारिक निवेदन परराष्ट्र मंत्रालयाने संध्याकाळी जारी केलं. त्यात भारताचे किती सैनिक शहीद झाले याचा उल्लेख नाही.
Indian intercepts reveal that Chinese side suffered 43 casualties including dead and seriously injured in face-off in the Galwan valley: Sources confirm to ANI pic.twitter.com/xgUVYSpTzs
— ANI (@ANI) June 16, 2020
दरम्यान या निवेदनात म्हटलं आहे की, ’15 जूनला संध्याकाळी आणि रात्री उशिरा चीनकडून आहे ती परिस्थिती बदलण्याचा एकतर्फी प्रयत्न झाला. त्यातून दोन्ही सैन्याचा हिंसक सामना झाला. दोन्ही देशांचं यात नुकसान झालं. हे नुकसान वाचवता आलं असतं. सीमाप्रश्नी जबाबदार दृष्टिकोन भारताने नेहमीच ठेवलेला आहे. त्यामुळे भारतीय सैन्याची कुठलीही कारवाई ही प्रत्यक्ष ताबारेषेच्या भारतीय बाजूच्या हद्दीतच झालेली आहे. आम्हाला चीनकडूनही तशीच अपेक्षा आहे. सीमा क्षेत्रात शांतता राखण्याचा भारताचा प्रयत्न पहिल्यापासून आहे. आपसांतील वादांवर संवादाच्या माध्यमातून तोडगा निघू शकतो, यावर आमचा विश्वास आहे. भारताची अखंडता आणि सार्वभौमत्व कायम ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.’