Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaNewsUpdate : जागतिक आरोग्य संघटनेने दिला कोरोना वाढीचा इशारा

Spread the love

देशभरातल्या आणि जगभरातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेनेने  दिलेल्या इशाऱ्यानुसार आशिया, दक्षिण अमेरिका आणि मध्य पूर्व देशांमध्ये कोरोनाचं थैमान कायम राहणार असल्याचे  सांगण्यात आले आहे. दरम्यान गेली काही  दिवसांपासून  कोरोनाबाधित रुग्णाच्या संख्येत वाढ होत असून १५ दिवसांमध्ये जवळपास रोज १ लाखहून अधिक नवीन रुग्णांना लागण झाल्याचे दिसून येत आहे.  पुढील दोन आठवडे अशीच स्थिती कायम राहिल असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.

दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेडरॉस एडहोम यांच्या म्हणण्यानुसार ५० दिवसांनंतर पुन्हा एकदा चीनमध्ये बिकट स्थिती निर्माण झाली आहे. बीजिंगमध्ये ९० हजार लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. चीन सध्या हे प्रकरण सध्या चांगल्या पद्धतीनं हाताळलं जाईल असा जागतिक आरोग्य संघटनेला विश्वास आहे. चीनला काही मदत लागल्यास जागतिक आरोग्य संघटनेचं एक पथक तिथे जाणार असल्याची माहिती मिळत आहे. आफ्रिकेमध्येही कोरोनाचा संसर्ग वेगानं पसरत असल्याचंही सांगितलं आहे. येत्या दोन आठवड्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होईल असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आला आहे

भारतात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या आकड्यात जास्त वाढ झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून नवीन रुग्णांचा आकडा हा १० हजारांच्या घरात आहे. आजही १० हजार ६६७  नवीन रुग्णांची नोंद झाली. तर ३८० जणांचा मृत्यू झाला आहे. यासह भारतातील कोरोनाबाधितांचा आकडा आता ३ लाख ४३ हजार ९१ वर पोहचला आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे देशात सध्या १ लाख ५३ हजार १७८  सक्रीय रुग्ण असले तरी निरोगी झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. देशात आतापर्यंत १ लाख ८० हजार ०१३ रुग्ण निरोगी झाले आहे. तर, एकूण मृतांची संख्या ९  हजार ९०० आहे. दुसरीकडे अमेरिका, ब्राझील आणि रशियानंतर आता भारताचा सर्वात जास्त कोरोना रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत चौथा क्रमांक लागतो.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!