AurangabadNewsUpdate : कारागृहातून पळालेला बबल्यास अटक , कोविड क्वारंटाईन कक्षातून पळालेला दुसरा कैदी मात्र फरारच

औरंगाबाद – हर्सूल कारागृहातील भिंत ओलांडून खुनातील आरोपी बबल्या याने पळ काढला. मात्र कारागृहातील कर्मचा-यांनी त्याचा पा’लाग करत त्यास महावितरणच्या कार्यालयाजवळ पकडले. हि घटना आज सकाळी घडली. विशेष म्हणजे पाच दिवसापुर्वी कोविड रूग्नालयात उपचार घेणा-या हर्सूल कारागृहातील दोन कैद्यांनी पळ काढला होता. हर्सूल कारागृहात कुख्यात गुन्हेगार बबल्या याने आज सकाळी कारागृहातील भिंत ओलांडुन पळ काढला होता. घटनेची माहिती मिळताच कारागृुहातील कर्मचा-यांनी त्याचा पा’लाग करत त्यास महावितरणच्या कार्यालयाजवळ पकडले. बबल्या हा अट्टल गुन्हेगार असुन त्याचा विरोधात खुनाचे दोन गुन्हे दाखल आहेत. कोविड क्वारंटाईन कक्षातून पळालेला खून प्रकरणातील आरोपी अकरम खान हा अद्यापही फरार असून त्याचा शोध सुरु आहे. हि घटना ताजी असताना बबल्याने कारागृहातून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याने उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.