AurangabadNewsUpdate : तीस हजारांची लाच घेतांना ट्रॅप , दोन पोलिसांना पकडले, एक फरार

औरंगाबाद -३० हजाराची लाच घेऊन पोलिस कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक अधिकार्यांसमोर फरार झाला.पण त्याच्या जोडीदाराला पकडण्यात आले.पोलिस शिपाई कैलास चेळेकर आणि अनिल जायभाये अशी आरोपींची नावे आहेत.हे दोघेही ग्रामीण पोलिस अधिक्षक कार्यालरातील उपविभागीय कार्यालयात काम करतात. त्यापैकी जायभाये ३० हजार रु.घेऊन पसार झाला असल्याची माहिती वरिष्ठ सुत्रांनी दिली.
गेल्या १६ मार्च रोजी चिकलठाणा फुलंब्री हद्दीत डब्बर वाहतूकीच्या तीन हायवा ट्रकवर कारवाई न करण्यासाठी ३०हजार रु महिना ठरवण्यात आला होता. दरम्यान फिर्यादीने एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर त्याची भणक आरोपींना लागण्याची शक्यता वरिष्ठ सुत्रांनी वर्तवली आहे.तसेच आरोपींचे सीडीआर तपासल्यानंतर यामधे वरिष्ठ अधिकार्याच्या नावाचा उल्लेख आहे की नाही हे पुराव्यानिशी सिध्द होईल. दरम्यान पैशांची मागणी आणि पंचा समोर लाच स्वीकारली यामुळे आरोपीविरुध्द सबळ पुरावे उपलब्ध आहेत अशी माहिती सुत्रांनी दिली.या प्रकरणात चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरु होती.वरील कारवाईत पोलिस निरीक्षक संदीप राजपूत यांनी सहभाग नोंदवला होता.