चर्चेतली बातमी : विवाह सोहळ्याला आले १५० लोक !! नवविवाहित दाम्पत्यासह च्या आई-वडिलांविरोधात गुन्हा…

देशभर पसरत चाललेल्या कोरोनाच्यासंसर्गामुळे विवाहाला ५० आणि अंत्ययात्रेसाठी २० लोकांचे बंधन शासनाने घालून दिलेले आहे . दरम्यान अंत्ययात्रेसाठीचे बंधन लोक पळत आहेत परंतु विवाहाच्या बाबतीत मात्र हे बंधन लोक पाळताना दिसत नाहीत. अशाच एका प्रकरणात विवाहाला १५० हुन अधिक लोक आल्यामुळे कर्जत पोलिसांनी एका नवविवाहित जोडप्यासह त्यांच्या आई-वडिलांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा लग्नाचा सोहळा एका मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. दरम्यान मंगल कार्यालयाच्या मालकावरही गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
या लग्न सोहळ्याची अधिक माहिती अशी कि , कर्जत परिसरात रविवारी दुपारच्या सुमारास एका मंगल कार्यालयात लग्नसोहळा आयोजित करण्यात आला होता. पोलीस आणि स्थानिक प्रशासनानं या लग्नसोहळ्यात केवळ ५० पाहुण्यांच्या उपस्थितीला परवानगी दिली होती. पोलीस आणि प्रशासनातील अधिकारी या लग्नसोहळ्याच्या नियोजनावर लक्ष ठेवून होते. त्याचवेळी त्यांनी लग्नाला आलेल्या पाहुण्यांची संख्या मोजली. त्यावेळी या लग्नाच्या सोहळ्यात ५० ऐवजी १५० पाहुणे आले होते. त्यामुळं पोलिसांनी नवरा-नवरी आणि त्यांच्या पालकांविरोधात कलम १८८, २६९ आणि २७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.