Aurangabad Crime : विभक्त जोडप्याच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण, अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद – विभक्त असलेल्या पती पत्नीच्या अल्पवयीन मुलीला आईच्या ताब्यातून चाकूचा धाक दाखवत जातीवाचक शिवीगाळ करंत अपहरण केल्याचा गुन्हा मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री दाखल झाला.
पिडीत मुलीची आई संतोषीमातानगर मुकुंदवाडी येथे राहते व वडिल वाळूज जोगेश्वरी येथे राहतात. ८जून रोजी पिडीत मुलीच्या आईने दिराच्या नंबरवर सासुला फोन करुन मुलगी तुमच्या घरी घेऊन जा असा मेसैज दिला.त्यानुसार पिडीत मुलीचे वडील मच्छींद्र खंडागळे(३८) हे मुलीस नेण्याकरता मुकुंदवाडीला मंगळवारी आले असता मुलीला मुकुंदवाडी परिसरात राहनारा ज्ञानेश्वर गिरी याने ९जून रोजी सकाळी ६ वा. मोटरसायकलवर बसवून पळवून नेले. व जातांना पिडीत मुलीच्या आईला जातीवाचक शिवीगाळ करंत धमकावले. ही माहिती मिळताच मंच्छींद्र खंडागळे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला आहे.अशी माहिती पोलिस निरीक्षक शरद इंगळे यांनी दिली.या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस आयुक्त हनुमंत भापकर करत आहेत.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!