#CoronaVirusUpdate : जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याची स्थिती , राज्यात ३८०० लोकांवर यशस्वी उपचार , रुग्णांची संख्या २० हजार पार , एकूण मृत्यू ७७९

गेल्या २४ तासांत कोरोनामुळे ४८ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या आता ७७९वर पोहचली आहे. दुसरीकडे आज पुन्हा एकदा एकाच दिवसात हजाराच्यावर नवीन रुग्णांची भर पडून रुग्णांची एकूण संख्या आता २० हजार २२८ इतकी झाली आहे. महाराष्ट्रात आज दिवसभरात करोनाचे ११६५ नवीन रुग्ण आढळले असून करोनाबाधित एकूण रुग्णांचा आकडा काहीसा दिलासा म्हणजे आज तब्बल ३३० रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले असून या सर्व रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यात ३ हजार ८०० जणांना करोनाविरुद्धची लढाई जिंकण्यात यश मिळाले आहे.
आज झालेल्या मृत्यूंपैकी २१ पुरुष तर २७ महिला आहेत. मृतांमध्ये ६० वर्षे किंवा त्यावरील २७ रुग्ण आहेत तर १८ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ३ जण ४० वर्षांखालील आहेत. रुग्णांना असणाऱ्या इतर आजारांबाबत ९ जणांची माहिती अप्राप्त आहे. उर्वरित ३९ रुग्णांपैकी २८ जणांमध्ये (७२ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख २७ हजार ८०४ नमुन्यांपैकी २ लाख ०६ हजार ४८१ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर २० हजार २२८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २ लाख ४१ हजार २९० लोक होम क्वारंटाइनमध्ये असून १३ हजार ९७६ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
आज राज्यात ४८ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या ७७९ झाली आहे. मालेगाव शहरातील ८ मृत्यू हे २५ एप्रिल ते ८ मे २०२० या कालावधीतील आहेत. आज झालेल्या मृत्यूंपैकी मुंबई मधील २७, पुण्यातील ९, मालेगाव शहरात ८, पुणे जिल्ह्यात १, अकोला शहरात १, नांदेड शहरात १ तर अमरावती शहरात १ मृत्यू झाला आहे. दरम्यान,राज्यातील ज्या भागांत रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या १२४३ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १२ हजार ३८८ सर्वेक्षण पथकांनी काम केले आहे. त्यांनी ५५ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.