AurangabadNewsUpdate : किराणा दुकान फोडले , अल्पवयीन बालकांना मुद्देमालासह घेतले ताब्यात

उस्मानपुरा भागातील किराणा दुकानाचे शटर उचकटून साहित्य लंपास करणाºया दोन अल्पवयीन बालकांना उस्मानपुरा पोलिसांनी चोवीस तासात ताब्यात घेऊन किराणा साहित्य हस्तगत केले. दुकान फोडीची घटना शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आली.
उस्मानपुरा संजय हाऊसिंग सोसायटी येथील विवेक सदाशिवराव कुलकर्णी (६५) यांचे रुचिता अॅन्ड प्रोव्हिजन्स नावाचे प्रतापनगरात दुकान आहे. शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास कुलकर्णी हे दुकान बंद करुन घरी गेले होते. त्यानंतर मध्यरात्री दोन अल्पवयीन बालकांनी दुकानाचे शटर उचकटून त्यातील गव्हाचे तीन कट्टे, प्रत्येकी तांदूळ, तुरदाळीचा एक कट्टा, सोयाबीन तेलाचा बॉक्स तसेच कोलगेट, कॅडबरी, खोबरा तेल आणि बिस्किटचे पुडे असे दहा हजार दोनशे रुपयांचे साहित्य लंपास केले. हा प्रकार सकाळी सहाच्या सुमारास निदर्शनास आल्यावर कुलकर्णी यांनी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी पाहणी केल्यानंतर लगेचच काही तासात अल्पवयीन बालकांना ताब्यात घेत साहित्य जप्त केले. ही कारवाई उपायुक्त डॉ. राहुल खाडे, सहायक पोलिस आयुक्त रविंद्र साळोखे, निरीक्षक दिलीप तारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपनिरीक्षक कल्याण शेळके, जमादार प्रल्हाद ठोंबरे, सतीश जाधव, संतोष शिरसाठ, संजयसिंग डोभाळ यांनी केली.
……..