Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#AurangabadCrimeUpdate : घरफोडी करणारे तिघे पोलिसांच्या ताब्यात, पोलिसांनी जप्त केला ८० हजाराचा मुद्देमाल

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंंंगाबाद : मुकुंदवाडी  परिसरात विविध ठिकाणी घरफोड्या करणा-या दोन विधीसंघर्षग्रस्त बालकासह त्यांच्या म्होरक्याला मुकुंदवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तिघांकडून पोलिसांनी ८० हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. तिघांनी मिळून मुवुंâदवाडी परिसरात तीन घरफोड्या केल्या असल्याची कबूली पोलिसांना दिली आहे.
आकाश रमेश झिने (वय २३, रा.राजनगर, मुकुंदवाडी ) असे म्होरक्याचे नाव आहे. आकाश झिने याने आपल्या सोबत दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना घेत विविध ठिकाणी तीन घरफोड्या केल्या होत्या. आकाश झिने व त्याच्या साथीदारांच्या ताब्यातून पोलिसांनी दोन एलईडी टीव्ही, एक  कॅमेरा , चांदीचे दोन शिक्के असा एवूâण ८० हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मुकुंदवाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक शरद इंगळे, सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राहुल बांगर, सहाय्यक फौजदार कौतीक गोरे, जमादार कैलास  काकड, सुनील पवार, मनोहर गिते, विजय चौधरी, प्रकाश सोनवणे, संतोष भानुसे, सुधाकर पाटील आदींच्या पथकाने केली.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!