Aurangabad Crime : पोलिसांवर हल्ला करणा-या चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी

औरंंंगाबाद : नाकाबंदी करीत असलेल्या पोलिसांवर हल्ला करून मारहाण करणाNया चौघांचीही हर्सुल कारागृहात रवानगी करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही.डी.शृंगारे यांनी सोमवारी (दि.१३) दिले. चौघांचीही पोलिस कोठडीची मुदत संपल्याने चौघांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. या प्रकरणातील एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताकीद देवून नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
गेल्या आठवड्यात गुरूवारी (दि.९) दुपारी १२ वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अण्णाभाऊ साठे चौकात नाकाबंदी करीत असलेले वाहतूक शाखेचे जमादार जनार्दन जाधव व दैनसिंग जोनवाल यांच्यासोबत वाद घालून शेख शाहरूख शेख फारूख (वय २४), शेख फारूख शेख कादर (वय ५३), शेख साजेद उउर्फ अशु शेख फारूख (वय २३) सर्व रा. रोजाबाग ईदगाह जवळ, शेख समीर शेख सलीम (वय ३०, रा. नागापुर, ता.कन्नड, ह.मु.बायजीपुरा) व एक १४ वर्षाचा विधीसंघर्षग्रस्त बालकाने लाठीने हल्ला केला होता.
याप्रकरणी वाहतूक शाखेचे सहाय्यक निरीक्षक मनोज बहुरे यांच्या तक्रारीवरून पाच जणांविरूध्द सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी तपासाची चव्रेâ फिरवून चौघांनाही अवघ्या दोन तासात अटक केली होती. त्यावेळी चौघांनाही न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. चौघांचीही पोलिस कोठडीची मुदत संपल्याने चौघांना सोमवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते.