#CoronaVirusEffect : माझ्या सन्मानासाठी ५ मिनिटे उभे राहण्याची कुरापत करू नका , मोदींनी भक्तांना सुनावले…

मेरे ध्यान में लाया गया है कि कुछ लोग यह मुहिम चला रहे हैं कि 5 मिनट खड़े रहकर मोदी को सम्मानित किया जाए। पहली नजर में तो यह मोदी को विवादों में घसीटने की कोई खुराफात लगती है।
— Narendra Modi (@narendramodi) April 8, 2020
दरम्यान, नवी मुंबईत आतापर्यंत ११०० लोकांना होम क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. तसेच करोना रुग्णांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेण्यात येत आहे. लोकांना घराबाहेर न पडण्याचं आणि गर्दी टाळण्याचं आवाहन सातत्याने प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मला वादात अडकवण्याचा प्रयत्न करू नका, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही खोडसाळांना सुनावले आहे. मोदींनी या संदर्भात ट्विट केले आहेत. त्यात पंतप्रधान मोदींनी त्यांना सल्लाही दिला आहे.
पंतप्रधान मोदी यांनी या संदर्भात दोन ट्विट केली आहेत. पंतप्रधान मोदींच्या सन्मानार्थ ५ मिनिटं शांत उभे राहा, अशी मोहीम काही लोकं चालवत असल्याचं आपल्या लक्षात आलं आहे. प्रथमदर्शनी हा सर्व प्रकार मला वादात अडकवण्यासाठीचा एक खोडसाळपणा असल्याचं वाटतंय, असं मोदींनी पहिल्या ट्विटमध्ये म्हटलंय. तरीही सदिच्छा म्हणून कुणी हे करत असेल, माझ्याबद्दल एवढं प्रेम असेल आणि मोदीचा सन्मान करायचा असेल तर करोना व्हायरसचे संकट आहे तोपर्यंत किमान एका गरीब कुटुंबाची जाबाबदारी घ्या. माझ्यासाठी यापेक्षा मोठा सन्मान कुठलाच नसेल, असं पंतप्रधान मोदींनी ट्विटमधून स्पष्ट केलंय.