#CoronaVirusEffect : ऐकावे ते नवलच !! लोक तर लोक आणि युपी पोलिसही भडकले कोरोनावर , केले ७५ पोलिसांनी मुंडण ….

देशभरात काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर लोकांनी देशभर दिवे लावले तर दिवे लावताना उत्तर प्रदेशातील मंजू तिवारी नामक भाजपच्या महिला अध्यक्षांनी कोरोनावर गोळीबार केल्याची घटना गाजत असतानाच उत्तर प्रदेशातून आता दुसरी बातमी आली आहे . या वृत्तानुसार कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आग्रा येथील फतेपूर शिक्री पोलिस ठाण्यातील पोलिस ठाण्याच्या निरीक्षकासह एकूण ७५ पोलिसांनी सामूहिक मुंडण केले असल्याचे वृत्त आहे.
सामूहिक मुंडन केल्यानंतर हे पोलीस डोक्यावर टोपी न घालता लोकांना आपले कार्य दिसावे या उद्देशाने शहरात गस्तीवर गेले तेंव्हा लॉकडाउन असताना लोकांनी घराच्या दरवाजात येऊन तसेच खिडक्यांमधून मुंडण केलेले पोलिस पाहिले आणि सर्व नागरिक आश्चर्यचकित झाले. बरेच लोक तोंडाला मास्क लावताच आणि डोकेही झाकतात हे आम्ही पाहिले आहे पाहिले आहे. याचे कारण म्हणजे करोना विषाणू डोक्याच्या केसांना देखील चिकटू शकतो असे डॉक्टरांनी सांगितले. तेथून तो श्वासावाटे शरीरात जाऊ शकतो. हे लक्षात घेत आम्ही मुंडण केले, असे फतेपूर शिक्री पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक भूपेंद्रसिंह बालियान यांनी सांगितले. मुंडण करण्याला संपूर्ण पोलिस ठाण्याचा होकार होता. यात एकूण ७५ पोलिसांनी मुंडण केले. हे मुंडण करताना सोशल डिस्टंसिंग पाळण्यात आले, असेही बालियान यांनी सांगितले.
दरम्यान मुंडण करणाऱ्या पोलिसांमध्ये प्रभारी निरीक्षकाव्यतिरिक्त निरीक्षक (गुन्हे) अमिक कुमार, नऊ उपनिरीक्षक, १५ मुख्य हवालदार आणि ४९ हवालदारांचा समावेश आहे. मुंडण केल्यानंतर सर्व पोलिस परिसरात गस्तीसाठी निघाले. सर्व पोलिस अशा अवस्थेत पाहून लोकांना आश्चर्य वाटले. मुंडण करणे हे पोलिसांच्या प्रोटोकॉलचे उल्लंघन नाही, असे पोलिस निरीक्षकांचे म्हणणे आहे. मोठे केस राखणे हे प्रोटोकॉलचे उल्लंघन आहे, मात्र केस छोटे करणे किंवा मुंडण करणे हा प्रोटोकॉलचा भंग कधीही नसतो, असे पोलिसांचे म्हणणे आहे.