Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad : करमाड परिसरात घरफोडी करणारे तिघे गजाआड

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंंंगाबाद : करमाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंभेफळ येथे मागील आठवडयात दोन ठिकाणी चोरटयांनी घरफोडी करून रोख ४१ आणि २ ग्रॅम सोन्याची अंगठी असा ऐवज चोरून नेला होता. करमाड पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून अट्टल तीन घरफोड्यांना गजाआड केले असून त्यांच्या ताब्यातून चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत रावसाहेब हिवाळे (वय २१ रा. खामगाव ता. फुलंब्री ह.मु. जयभवानी नगर, मुकूंदवाडी, औरंगाबाद), विजय भगवान कांबळे (वय २९, रा.अंबिकानगर, औरंगाबाद), किरण ऊर्फ आकाश अशोक जाधव (वय २०, रा. अंबिकानगर) अशी अटक केलेल्या घरफोड्यांची नावे आहेत. हे तिघेही कुंभेफळ येथे मागील १५ दिवसांपासून घर भाडयाने घेऊन राहत होते. ते दिवसा मोटरसायकलवर कुंभेफळ भागात फिरून घरांची रेखी करून त्याठिकाणी घरफोडी करीत होते.
पोलिसांनी अटक केलेले तिघेही रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असून यापूर्वीसुध्दा त्यांच्यावर शहर पोलिसांनी एमपीडीए नुसार कारवाई केली होती.ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, उपनिरीक्षक राजू नांनलोत, सुशांत सुतळे, जमादार संदीप जाधव, अनिल गायकवाड, सुनिल गोरे, परमेश्वर आढे, सुरेश सोनवणे, गणेश कांबळे, नागनाथ केंद्रे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!