#CoronaVirusUpdate : अमेरिकेतील परिस्थिती अद्याप गंभीर , जगातील मृत्यू दर १ टक्क्याने वाढला…!!

कोरोनाने चीन आणि इटली नंतर आता अमेरिकेत थैमान घातले आहे. अमेरिकेचे आर्थिक राजधानी असलेले न्यूयॉर्क शहर हे कोरोनाचं केंद्र आहे. दररोज बाधित आणि मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. एकट्या न्यूयॉर्कमध्ये आत्तापर्यंत ६०६ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ४६हजार रुग्णांना कोरोना झाल्याचं स्पष्ट झालंय. सर्व अमेरिकेत कोरोनाबाधित असलेल्यांची संख्या१ लाखावर गेली असून त्याने चीनलाही मागे टाकलं आहे. तर सर्व अमेरिकेतल्या मृत्यूचा आकडा १७०० झाला आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास अमेरिकेत ८० हजार लोकांचा मृत्यू होवू शकतो अशी भीती Institute for Health Metrics and Evaluation ने (IHME) व्यक्त केली असल्याचे वृत्त आहे.
दरम्यान या बाबतच्या वृत्तात म्हटले आहे कि , IHME ने यावर संशोधन केलं आहे. परिस्थिती अशीच राहिलं. त्यावर नियंत्रण मिळवलं नाही तर एप्रिल आणि मे महिन्यात दररोज २३०० जणांचा मृत्यू होवू शकतो असा अंदाजही IHMEच्या तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. जगभर कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. चीननंतर आता इटली, अमेरिका आणि स्पेनमध्ये झापाट्याने त्याचा प्रसार होत आहे. जगभरातल्या अनेक देशांमध्ये लॉकडाउन करण्यात आलं आहे. कोरोनामुळे मृतांचा आकडा २१ हजारांवर गेला आहे. तर ४ लाख ७२ हजार लोकांना कोरोनाची लागण झाली असून हा आकडा लवकरच ५ लाखांचा टप्पा गाठेल असा अंदाज Johns Hopkins Universityच्या तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. मात्र अशाच एका वृत्ताचे हाफकिन ने खंडन केले असून ४० कोटी भारतीयांना कोरोना होणार असल्याचा कुठलाही अहवाल त्यांनी केलेला नसून हि माहिती फेक आहे.
कोरोनाव्हायरसचं थैमान जगभरात आता पुढच्या टप्प्यात पोहोचल्याचं स्पष्ट आहे. ६ लाखांहून अधिक लोकांना याची लागण झाली आहे आणि यामुळे ताज्या आकडेवारीनुसार २८ हजाराहून अधिक मृत्यू झाले आहेत. तर १ लाख ३७ हजाराहून अधिक रुग्ण बरे होऊन आपापल्या घरी गेले आहेत. आजच्या आकडेवारीनुसार कालपर्यंत १६ टक्केवारी असणारा मृत्यू दर १ टक्केने वाढला आहे. भारतातही हा दर वाढून तो आता २० टक्के इतका झाला आहे.