#CoronaVirusUpdate : कोरोना टेस्टिंगचे किट बनविण्याचा परवाना गुजरात मधील कंपनीला, भारतातील एकमेव परवाना धारक कंपनी

देशभरात कोरोनाला टक्कर देण्यासाठी प्रत्येक सरकारबरोबर प्रत्येक जबाबदार व्यक्ती करीत असून करोनाव्हायरस टेस्ट किट बनविण्याचा परवाना गुजरातच्या अहमदाबाद येथील कोसारा डायग्नोस्टिक या कंपनीला सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ) कडून देण्यात आला आहे. भारतात करोना व्हायरस टेस्ट किट बनविण्याचा परवाना मिळवणारी ही पहिलीच कंपनी आहे. या किटवद्वारे अडीच तासामध्ये करोना व्हायरस संबधित चाचणी होवू शकते असा दावा या कंपनीने केला आहे. कोसारा डायग्नोस्टिक्स ही कंपनी अमेरिकेच्या को-डायग्नोस्टिक्स इंक आणि भारतीय अंबालाल साराभाई एंटरप्रायजेस या अन्य कंपन्यासोबत काम करते.
कोसारा डायग्नोस्टिक्सने परवाना मिळवण्यासाठी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेकडे एका महिन्यापूर्वी अर्ज केला होता. मंगळवारी त्यांना याचा परवाना मिळाला. अहमदाबाद मिररने या संदर्भात वृत्त दिले आहे. कोविड १९ वर कोणतीही लस आतापर्यंत उपलब्ध नसल्याने त्याचे निदान करण्याची आवश्यकता होती. त्यामुळे या किटची मागणी पूर्ण करण्याची क्षमता आमच्य़ाकडे आहे अशी माहिती को. डायग्नोस्टिक्स इंकचे मुख्य कार्यकारी अधिकारी ड्वेइट इगन यांनी दिली आहे.