Aurangabad : दोन चोर्या उघडकीस, ४ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, ७ अटकेत

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील घानेगाव आणि रांजणगाव शेणपुंजी भागातील चोरट्यांनी गेल्यावर्षी फेब्रूवारी ते डिसेंबर २०१९ या काळात वाळूज एमआयडीसी परिसरातील दोन कंपन्यातून केबल,डाय, वाॅल्ह्व, इत्यादी पावणे पाच लाख रु.चे सामान चोरुन ते रांजणगावातील व्यापार्याला विक्री करणार्या सात जणांच्या टोळीला व्यापार्यासहित वाळूज औद्योगिक पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
संतोष भिमराव कांबळे (३५),रिंकू राजकुमार घोरपडे (२२) दोघेही रा.घानेगाव, वैभव विष्णू ढोले (१९), मनोज काकाजी सुरवसे (१९) दिपक यज्ञकांत दुधमल(२०) फारुक हमीद पठाण (२०) शफीक अजमोद्दीन इनामदार(५०) भंगारविक्रेता अशी अटक आरोपींची नावे आहेत.
गणेश इंजिनिअरिंग आणि अॅंटो एनसिलरी या दोन कंपन्यातून वरील चोरट्यांनी केबल, बाॅल, वाॅल्ह्व, डाय, इत्यादी महत्वाच्या वस्तू चोरुन भंगार मधे विकल्या याचे ४ लाख ४० हजार रु. आरोपींना मिळाले होते.या दोन्ही प्रकरणाचे गुन्हे एम.वाळूज पोलिसांकडे फेब्रूते डिसेंबर २०१९ या काळात दाखल होते.त्यानुसार खबर्याने माहिती दिल्या नंतर पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय विठ्ठल चासकर,पोलिस कर्मचारी वसंत शेळके, कय्यूम पठाण,सुधीर सोनवणे, बाबासाहेब काकडे, शेख नवाब, एएसआय खंडागळे यांनी पार पाडली.पुढील तपास पोलिस निरीक्षक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली एम वाळूज पोलिस करंत आहेत.