Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भारत -पाक सीमेवरील तणावात वाढ : दोन्हीकडून सैन्याची जमवा जमव, सतर्कतेचा इशारा

Spread the love

आधी पुलवामा येथे झालेला दहशतवाई हल्ला आणि त्यानंतर बालाकोट येथील दहशतवादी तळांवर भारतीय हवाई दलाने केलेला हल्ला या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत असून  आता पाकिस्ताने नियंत्रण रेषेवर (LoC) सैन्याची आणखी जमावजमव सुरू केली आहे. तसंच मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र वाढवली आहेत. अफगाणिस्तान सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांची संख्या कमी करत पाकने त्यांना भारतीय सीमेवर पाठवले आहे. तसंच काश्मीरमध्ये भारतीय सीमेवर संवेदनशील चौक्यांवर पाकने शस्त्रास्त्र वाढवली आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. यामुळे लष्कराने सीमेवर सतर्कतेचा इशारा दिला आहे.
दुसरीकडे भारताने पाकिस्तानला सीमेवरील गोळीबारावरून इशारा दिला आहे. सीमावर्ती भागातील नागरिकांना आपल्या गोळीबाराचे लक्ष्य करू नये, असं भारताने पाकला ठणकावलंय. अशा हल्ल्यांचे पाकिस्तानच्या सैन्याला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असं भारतीय लष्कराने सुनावलंय. पाकिस्तानी सैन्याने नौशेरा सेक्टरमध्ये १५५ एममच्या तोफांनी जोरदार मारा केल्यानंतर भारतीय लष्कराने पाकला हा इशारा दिला आहे. पाकिस्तानच्या तोफांच्या माऱ्यानंतर भारतीय लष्करानेही बोफोर्स तोफांचा मारा करत प्रत्युत्तर दिलंय. भारत आणि पाकिस्तानच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची मंगळवारी हॉटलाइनवरून बातचीत झाली. यावेळी सीमावर्ती भागातील नागरिकांना गोळीबाराचे लक्ष्य करू नये, असं भारताने पाकला बजावलंय.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!