Aurangabad Crime : राणीहारासहित मंगळसूत्र चोराच्या आवळल्या मुस्क्या…

औरंगाबाद – दोन आठवड्यापूर्वी एक लाख रुपयांचा राणीहार हिसकावून नेणारा मंगळसूत्र चोर सी.सी.टि.व्ही.फुटेजच्या माध्यमातून मुकुंदवाडी पोलिसांनी पकडला. हेल्मेट उर्फ गौतम सोनकांबळे उर्फ विकी(३०) रा.मुकुंदवाडी असे चोरट्याचे नाव आहे.
गेल्या ४ मार्चरोजी फिर्यादी भारती संतोष गांगवे(२१) रा.रोहिदासनगर या नातेवाईकांकडील साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपून पायी घरी येत असतांना हेल्मेट उर्फ विकी ने भारती यांच्या गळ्यातील अडीच तोळे सोन्याचा राणीहार हिसकावून मोटरसायकलवरुन फरार झाला होता. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. तसेचहेल्मेट उर्फ विकी हा रेकाॅर्डवरचा गुन्हैगार असून गेल्याच महिन्यात तो हर्सूल कारागृहातून सुटला होता. पोलिस निरीक्षक शरद इंगlळे यांना माहिती मिळाली होती की, भारती गांगवेंचा सोन्याचा हार चोरणारा हेल्मेट मुकुंदवाडी परिसरात आला आहे. इंगळे यांनी गुन्हा घडलेल्या दिवसाचे सी.सी.टि.व्ही. फुटेज चेक केले असता त्यांची चोरट्याबद्दलची खात्री पटली व त्यांनी पीएसआय राहूल बांगर यांना पुढील कारवाईचे आदेश दिले.पीएसआय बांगर यांनी पोलिस कर्मचारी संतोष भानुसे , विजय चौधरी आणि प्रकाश सोनवणे यांना सोबंत घेऊन हेल्मेटला बेड्या ठोकल्या.