Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : पुंडलिक नगर पोलिसांनी “फिल्मी स्टाईल” पाठलाग करून “किडनॅपर”च्या तावडीतून तरुणाची केली सुटका पण “किडनॅपर” झाले पसार….

Spread the love

औरंगाबाद – गजानन महाराज मंदीर चौकातून आज दुपारी २ वा.तरुणाचे अपहरण करणार्‍या किडनॅपर्सने पोलिसांना पाहताच गाडी व तरुणाला रस्त्यावर सोडून आरोपी पसार झाले. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.
अतुल सतीष हजारे (२०) रा.परतूर जि.जालना असे अपहरण केलेल्या तरुणाचे नाव आहे. अतुल चे वडील सतीष हजारे यांचा परतूरला टूर्स अॅंड ट्रॅव्हल्स चा व्यवसाय आहे. सतीष हजारेंनी आरोपी जसपालसिंग यांच्या कडून एक वर्षापूर्वी १ लाख ७० हजार रु. ५ रु.शेकडा व्याजाने घेतले होते. तर या व्याजाचा परतावा ५०रु.शेकड्याने सतीष हजारे यांनी केला. व परतूरच्या हजारे यांच्या घराला कुलुप लावून हजारे कुटुंबियांना हाकलून दिले. म्हणून हजारे कुटुंब १ महिन्यापासून पुंडलिकनगर परिसरात राहात आहे. मंगळवारी दुपारी २वा. अतुल हजारे गजानन महाराज मंदीर चौकातील हाॅटेल मधे चहा घेत असतांना जसपालसिंग याने अतुल हजारेच्या कानाला पिस्तूल लावून त्याला बळजबरीने स्वीफ्ट कार मधे बसवून पळवून नेले. दरम्यान उपस्थितांनी हा प्रकार पुंडलिकनगर पोलिसांना कळवताच एपीआय घन्नशाम सोनवणे यांनी त्वरीत आरोपींचा पाठलाग करत त्यांना हाॅटेल रामा इंटरनॅशनल जवळ पकडण्यासाठी पोहोचले. पण पोलिसांची गाडी पाहताच आरोपी जसपालसिंग, अनिल पाचंगे, गणेश लालझरे, आणि जाॅनसिंग सर्व रा.परतूर यांनी स्विफ्ट कार अतुल हजारे सहित रस्त्यात सोडून पळ काढला. पिडीत अतुल हजारेला एपीआय सोनवणे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास आणल्यानंतर पुन्हा किडनॅपर्सनी अतुल हजारेला पोलिसांना संपर्क केला तर परिणाम वाईट होतील असा धमकीचा फोन केला. या प्रकरणी पुढील तपास एपीआय घन्नशाम सोनवणे करंत आहेत वरील कारवाईत पीएसआय प्रभाकर सोनवणे, पोलिस कर्मचारी रमेश सांगळे, बाळाराम चौरे, शिवाजी गायकवाड, प्रविण मुळे यांनी सहभाग घेतला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!