Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पाकिस्तानात धरपकड : मसूदच्या भावासह ४० जणांवर कारवाई

Advertisements
Advertisements
Spread the love

पाकिस्तानातल्या बंदी असलेल्या दहशतवादी संघटनांच्या ४० जणांवर पाकने कारवाई केली असून  याच मोहिमेचा भाग म्हणून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर याच्या भावाला पाकिस्तानने अटक केली आहे.  वाढत्या आंतरराष्ट्रीय समुदायाच्या दबावामुळे पाकिस्तानने ही कारवाई केली आहे. मुफ्ती अब्दुर रौफ असे मसूदच्या भावाचे नाव आहे. मुफ्ती अब्दुर रौफ, हम्माद अजहर यांच्यासह ४० जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पाकिस्तानचे मंत्री शहरयार खान यांनी पत्रकार परिषदेत दिली. खान यांनी सांगितलं, ‘भारताकडून सोपवण्यात आलेल्या पुराव्यांमध्ये (डॉजिअर) मुफ्ती अब्दुर रौफ आणि हम्माद अजहर यांची नावे देखील होती. मात्र ही कारवाई पाकिस्तानने कोणत्याही दबावाखाली केलेली नाही. अशा सर्व दहशतवादी संघटनांवर कारवाई केली जाईल.’  पाकिस्तानने नुकतीच एका कायद्यात सुधारणा केली आहे. त्यानुसार आता संयुक्त राष्ट्रांद्वारे दिलेल्या यादीतील दहशतवादी आणि प्रतिबंधित संघटनांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!