Delhi Election Updates: दिल्लीकरांनी देशद्रोही भाजपला नाकारले – नवाब मलिक

अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी भाजपवर टीका केली. दिल्ली विधानसभा निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, दिल्लीकरांनी देशद्रोही भाजपला नाकारले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशद्रोह्यांना मतदान करू नका असे आवाहन केले होते. दिल्लीच्या जनतेने त्याचे ऐकले असून भाजपला देशद्रोही घोषित करून टाकले आहे’. असा टोला त्यांनी भाजपला लगावला.
मोदी जी ने दिल्ली चुनाव में जनता से अपील की थी के वे एन्टी नॅशनल के खिलाफ मतदान करें,
जनता ने मोदी जी की सलाह मान मतदान कर भाजपा को एन्टी नॅशनल घोषित कर दिया।#DelhiResults #DelhiElectionResults— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) February 11, 2020
दिल्ली निवडणुकीत भाजपने हजारो कोटी रुपये वाटल्याचा आरोपही मलिक यांनी ट्विटमधून केला आहे. धन, बल और छल हार गया, विकास और विश्वास जीता’, असे ट्विट मलिक यांनी केले आहे. दिल्ली विधानसभा निवडणूक निकालाचे प्राथमिक कल पाहता मतदारांनी पुन्हा एकदा आम आदमी पक्षाच्या बाजुने कौल दिल्याचे समोर आले आहे. यात ‘आप’ला ५७ तर भाजपला १३ जागांवर आघाडी मिळाली असल्याचे चित्र आहे. आम आदमी पक्षाने बहुमत गाठल्याने दिल्लीत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषालाही सुरुवात केली आहे. भाजप पदरी अपयश पडल्यानंतर विरोधकांनी भाजपवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे.