Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

दिल्लीची हवा : केंद्रीय मंत्री जावडेकर म्हणतात , केजरीवाल दहशतवादीच , माझ्याकडे आहेत पुरावे…

Advertisements
Advertisements
Spread the love

भाजपने दिल्ली विधानसभेची निवडणुक प्रतिष्ठेची केली असून या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपकडून सातत्याने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना टार्गेट करण्यात येत आहे. दरम्यान भाजप खासदार प्रवेश वर्मा यांनी केजरीवाल यांचा उल्लेख दहशतवादी असा केला होता. त्याचाच पुनरुच्चार करत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही केजरीवाल दहशतवादी असल्याचे अनेक पुरावे आहेत, असा गंभीर आरोप आज केला. दरम्यान, जावडेकर यांच्या विधानावर आम आदमी पक्षाकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली असून यासंबंधी निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याची तयारी पक्षाने केली आहे.

Advertisements

दरम्यान आज प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन अरविंद केजरीवाल यांच्यावर थेट हल्ला चढवला. केजरीवाल भाबडा चेहरा करून ‘मी दहशतवादी आहे का?’, असा सवाल विचारत आहेत. त्याचे उत्तर होय असे आहे. याचे अनेक पुरावेही उपलब्ध आहेत. मी अराजकवादी आहे, असे जाहीर विधान केजरीवाल यांनी केलेले असून अराजकवादी आणि दहशतवादी यात फारसा फरक नसतो, अशा शब्दांत जावडेकर यांनी निशाणा साधला.

Advertisements
Advertisements

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याआधी भाजप खासदार प्रवेश वर्मा यांनीही अरविंद केजरीवाल यांची तुलना दहशतवाद्यांशी केली होती. एका जाहीर सभेत बोलताना, केजरीवालांसारखे नटवरलाल, केजरीवालांसारखे दहशतवादी देशात लपलेले आहेत. त्यामुळे काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढावे की केजरीवालांसारख्या दहशतवाद्यांशी लढावे, असा प्रश्न आम्हाला पडतो, असे वर्मा म्हणाले होते. वर्मा यांच्या या विधानानंतर आपकडून  वर्मा यांच्याविरुद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे . या टीकेचे  उत्तर देताना केजरीवाल यांनी, मी तुम्हाला मुलासमान वाटत असेन तर झाडू या निशाणीला मतदान करा आणि मी दहशतवादी आहे असे तुम्हाला वाटत असेल तर कमळापुढील बटण दाबा, असे केजरीवाल म्हणाले होते. त्यानंतर आता जावडेकर यांनीही वर्मा यांची री ओढल्याने येत्या काळात आप विरुद्ध भाजप हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!