राज ठाकरे आणि भाजप यावर आठवलेंनीही दिली हि प्रतिक्रिया…

भाजपा आणि मनसे हे दोन पक्ष एकत्र आले तर भाजपाचेच नुकसान होईल अशी प्रतिक्रिया रिपाइंनेते अध्यक्ष रामदास आठवले यांनी केलं आहे. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या सीएए अर्थात नागरिकत्व सुधारणा कायद्याला पाठिंबा देण्यासाठी रामदास आठवले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. या मोर्चानंतर पत्रकारांशी बोलताना रामदास आठवले यांनी भाजपा आणि मनसे यांची युती होऊ शकते का? या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर आपले मत मांडले.
आठवले म्हणाले कि , ” मनसे अध्यक्ष राज ठाकरे भाजपासोबत येणे , हे भाजपासाठी हिताचं ठरणार नाही. जर राज ठाकरेंनी त्यांच्या भूमिकेत बदल केला तर त्यामध्ये त्याचे आणि त्यांच्या मनसे या पक्षाचे नुकसान आहे. त्यामुळे तूर्तास तरी भाजपा आणि मनसे यांची युती होऊ शकते असे वाटत नाही. शिवसेना आज भाजपासोबत नाही मात्र आरपीआय भाजपा, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ताकदीने उभी आहे. दलितांची मतं मिळवण्यासाठी आरपीआयला भाजपाचं समर्थन आहे त्यामुळे राज ठाकरेंची सध्या गरज नाही ” असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
दरम्यान मनसे आणि भाजपा सध्या तरी एकत्र येण्याची चिन्हं नाहीत असं फडणवीस यांनीही म्हटलं होतं. आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत त्यामुळे व्यापक विचार करतो. तसाच विचार राज ठाकरेंनी केला आणि त्यांची भूमिका बदलली तर आम्ही मनसेला सोबत घेण्याचा विचार करु असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. आता रामदास आठवले यांनी मात्र भाजपा आणि मनसे हे दोन पक्ष एकत्र येणं हे भाजपासाठी हिताचं नाही असं म्हटलं आहे.