Aurangabad Crime : पोलिसांनी नैसर्गिक विधीसाठी म्हणून सोडले आणि तो हातकडीसह पळाला खरा , पण अवघ्या पाच तासात पकडला !!

नैसर्गिक विधीच्या निमित्ताने शौचालयाची खिडकी तोडून सिटी चौक पोलिसांना आज दुपारी १२ वा. हाथकडीसह गुंगारा देऊन फरार झालेला रेकाॅर्डवरचा चोरटा जिन्सी पोलिसांनी हाथकडी तोडून घेण्यासाठी आलेला असतांनाच पकडला. या प्रकरणी पोलिस उपायुक्त राहूल खाडे यांनी जिन्सी पोलिसांना १० हजार रु.चे रिवाॅर्ड घोषीत केले.
जबरी चोरी सारखे गुन्हे करुन फरार झालेला रेकॉर्ड वरील कुख्यात चोरटा जावेद उर्फ जे.के. शेख कलीम (२६, रा. शहागंज पाण्याच्या टाकीजवळ) याला सिटीचौकपोलिसांनी बुधवारी संध्याकाळी ५ वा पकडले. आज (गुरुवारी) कोर्टात हजर करण्यापूर्वी त्याला सिटीचौक पोलिस ठाण्याचे कर्मचारी बडे आणि पठाण हे वैद्यकीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात घेऊन आले होते.पण पोटात दुखत असल्याचे कारण बडे आणि पठाण यांना सांगितले.याची खात्री पटल्याने ” लवकर ये..” म्हणत जावेदला नैसर्गिक विधीसाठी सोडले . जावेदनेही पोलिसांच्या सौजन्याचा फायदा घेत दार बंद करुन खिडकी तोडून पळाला. तो जसा पळाला पोलिसांच्या व्हाॅट्सअॅपग्रुपवर हा मेसेज व्हायरल झाला. गुन्हेशाखेचे एक पथक पोलिसनिरीक्षक मधुकर सावंत यांनी पीएसआय अमोल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पाठवले.
दरम्यान जिन्सी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांना जावेद शहाबाजारात फिरत असल्याचे कळाले. तर दुसर्या खबर्याने पीएसआय शेळके यांना जावेद हाथकडी तोडून घेण्यासाठी किराडपुर्यात येत असल्याची माहिती मिळाली.त्यानुसार केंद्रे यांच्या आदेशावरुन पीएसआय दत्ता शेळके यांनी पथकासह किराडपुर्यातील दोन्ही तिन्ही भागात पोलिसांना पाठवले. व स्वता:ही जावेदच्या पाठलागावर गेले. जावेदने शेळकेंना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला.पण शेवटी पीएसआय शेळके यांनी जावेदला जेरबंद केलेच.पोलिसांच्या व्हाॅट्सअॅपग्रुपवर समाधानाचे हातांचे तळवे चमकले. पोलिसउपायुक्त निकेश खाटमोडे यांनीही जिन्सी पोलिसांचे कौतूक केले.