लातूर जिल्हा जंगम समाजाच्या वतीने आंतरराज्य वधू -वर परिचय मेळाव्याचे आयोजन

लातूर जिल्हा जंगम समाज प्रणित जंगम वेल्फेअर फाउंडेशनच्यावतीने रविवार दि. १२ जानेवारी रोजी आंतरराज्य जंगम समाज वधु-वर परिचय मेळावा २०२० चे आयोजन करण्यात आले आहे. वसुंधरा रत्न राष्ट्रसंत ष . ब्र . १०८ शिवलिंग शिवाचार्य महाराज, वीर मठ संस्थान, राजूर आणि ष . ब्र . १०८ शांतवीरलिंग शिवाचार्य महाराज, हिरेमठ संस्थान, औसा यांच्या दिव्य सानिध्यात सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत कस्तुराई मंगल कार्यालय, छत्रपती संभाजी महाराज चौक, औसा रोड लातूर येथे हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यात जंगम वेलफेयर फाउंडेशन लातूर यांच्यावतीने लातूर जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात येणार असल्याचेही संयोजकांनी कळविले आहे.
या मेळाव्याला मुख्य अतिथी म्हणून लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, नाशिक महसूल विभागाचे उपायुक्त दिलीप स्वामी, दिव दमनचे पोलीस अधीक्षक हरेश्वर स्वामी, न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड अलिबाग येथील संदीप स्वामी आदींची यावेळी मुख्य अतिथी म्हणून उपस्थिती असेल.
राज्यातील सर्व समाज बांधवांनी या महान मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजन समितीचे अध्यक्ष जगदीश शिवाजी स्वामी, संजय शांतय्या स्वामी, महिला उपाध्यक्ष सविता स्वामी, इंजि. सुहास स्वामी, स्वागताध्यक्ष डॉ. गणेश स्वामी, सुनील स्वामी, शिवदर्शन स्वामी, शरणाप्पा दावणगिरे, नितीन कलेमले, डॉ. संजय वाडकर, सुभाष देवणीकर, षण्मुखानंद मठपती, सूर्यकांत पत्रे, डॉ. मयुरी बालकुंदे, श्रीकांत हिरेमठ, संतोषस्वामी कोळ्ळे, डॉ. अशोक काळगे, शिवनी राजूरकर, मुख्य समन्वयक इंजि. संगमेश्वर स्वामी, शिवय्या स्वामी झरीकर, शिवप्रसाद स्वामी, संगमेश्वर स्वामी हंडरगुळीकर, अनिल स्वामी किल्लारिकर, इंजिनीयर सचोटी स्वामी, सुनंदाताई स्वामी, सविता विजय कुमार स्वामी, शोभा सावळे, संगीता चिट्टे, वैशाली खटाळकर स्वामी, शीतल कुमार स्वामी, योगेश स्वामी, जंगम वेल्फेअर फाऊंडेशनचे अध्यक्ष नागेश महालिंग स्वामी आदींनी केले आहे या मेळाव्याच्या यशस्वितेसाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.