Aurangabad Crime : रेकाॅर्डवरचा गुन्हेगार जेरबंद , चोरीचा ट्रक खरेदी प्रकरण, गुन्हे शाखेची कामगिरी

औरंंंगाबाद : चोरीचा हायवा ट्रक विकत घेणा-याला गुन्हे शाखा पोलिसांनी नांदेड येथून जेरबंद केले. चोरीचा हायवा ट्रक विकत घेणारा मोहम्मद शरीफ मोहम्मद सरवर शेख (वय ५०, रा.मोमीनपुरा, करबला रोड, इतवारा नांदेड) हे रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार असून त्याच्याविरूध्द गंभीर स्वरूपाचे २० ते २५ गुन्हे दाखल असल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत यांनी बुधवारी (दि.१) दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू ताराचंद दौलनपूरे यांचा हायवा ट्रक क्रमांक (एमएच-२०-एटी-१०७७) शेख शाकीर शेख रज्जाक (वय २७, रा.प्रियदर्शनी चौक, इंदिरानगर), शेख नजीर उर्पâ बब्बु शेख मुनीर (वय ४२, रा.इंदिरानगर, गारखेडा) यांनी ४ जुलै २०१९ रोजी लंपास केला होता. चोरी केलेला ट्रक दोघांनी नांदेड येथील कुख्यात गुन्हेगार मोहम्मद शरीफ मोहम्मद सरवर शेख याला विक्री केला होता. मोहम्मद शरीफ याने सदरील हायवा ट्रकचे सुटे भाग करून काही भाग विकले होते. तर काही भाग देगलूर नाका येथील नळगे पेट्रोलपंपासमोर लपवून ठेवले होते.
गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार नंदकुमार भंडारे, जमादार संतोष सोनवणे, अफसर शहा, योगेश गुप्ता, नंदलाल चव्हाण, रितेश जाधव, लखन गायकवाड, नितीन देशमुख आदींच्या पथकाने नांदेड येथून मोहम्मद शरीफ मोहम्मद सरवर शेख याला अटक केली. त्याच्या ताब्यातून हायवाचे ७० हजार रूपये किमतीचे सुटे भाग पोलिसांनी जप्त केले आहेत.