Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad : बायपासवरील गॅरेजला लागलेल्या आगीत दोन दुकानांसह कार, बस भस्मसात

Advertisements
Advertisements
Spread the love

बीडबायपास भागातील पटेल लॉन्सजवळ असलेल्या गॅरेज आणि अ‍ॅटो पार्टस अशा दोन दुकानांना शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास अचानक आगीने विळखा घातला. या भीषण आगीत गॅरेजमधील साहित्यासह नजीकच उभी असलेली कार व एक खासगी देखील भस्मसात झाली. मात्र, या आगीचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.

Advertisements

बीडबायपास भागात मोहन पप्पु सोनवणे यांचे गॅरेज आहे. त्यांच्या गॅरेजच्या शेजारी अक्रम हाश्‍मी यांचे प्रेसिडेंट मोटार्स अ‍ॅटो पार्टस नावाचे दुकान आहे. या दुकानांना शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास अचानक आग लागली. आगीचा भडका होताच परिसरातील नागरिकांनी दुकानांच्या दिशेने धाव घेतली. अग्निशमन दलाला संपर्क करण्यापुर्वीच आगीने रौद्ररुप धारण केले होते. नागरिकांनी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होईपर्यंत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. अवघ्या काही मिनिटात अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले. तसेच पाणी पुरवठा करण्यासाठी एका टँकरची मदत घेण्यात आली. सुमारे दोन तासानंतर ही आग आटोक्‍यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. आगीत गॅरेज दुकानांचे मोठे नुकसान झाले. तसेच प्रेसिडेंट मोटार्स अ‍ॅटो पार्टससमोर उभी कार व खासगी बस आगीत भस्मसात झाली. ही वाहने दुरुस्तीसाठी आणली असावी असा अंदाज आहे. घटनेनंतर अग्निशमन दलाकडून पंचनामा करण्यात आला. परंतु आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. दुकान जळालेल्या मालकांकडून अद्याप माहिती न आल्याने आगीत किती नुकसान झाले हे देखील स्पष्ट झाले नसल्याचे अग्निशमन दलाच्या अधिका-यांनी सांगितले. आग विझवण्यासाठी अधिकारी अब्दुल अजीज, सिडकोचे जवान भाकडे, भोसले, वेलदोडे, मावले, खांडेकर, कदम, वाहनचालक तुपे यांनी परिश्रम घेतले.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!